मेष : विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल बक्षीस मिळू शकते. एक नकारात्मक विचार तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करू शकतो, हे लक्षात ठेवा. घरात शुभ कार्य ठरेल. वाहन विषयक काम निघेल. एखादी चांगली वार्ता मिळेल. मित्रांचे उत्तम सहकार्य लाभेल. नात्यांमधील विश्वास वाढीस लागेल.
वृषभ : सर्व कामे वेळेवर पूर्ण झाल्यास मन प्रसन्न राहील. मनातील कोणत्याही प्रकारचा तणाव दूर होईल. मित्र आणि नातेवाईक मदत करतील. लहान प्रवास घडेल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. कर्तृत्वात वाढ होईल. मानसिक स्वास्थ्य जपावे. मनातील इच्छेबाबत आग्रही राहाल.
मिथुन : तुम्ही कोणत्याही स्पर्धेत भाग घेत असाल तर दिवस तुमच्या अनुकूल असेल. घरामध्ये कोणताही शुभ कार्यक्रम होऊ शकतो. आज तुम्हाला लवकर राग येईल, ज्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.विषयास अनुसरून बोलावे. अचानक धनलाभ संभवतो. घरातील गोष्टींबाबत दक्ष राहावे. कठीण कामे सुलभतेने पार पाडाल. अपचनाचा त्रास संभवतो.
कर्क : मालमत्तेचा वाद कोणाच्या तरी मध्यस्थीने सोडवण्याचा प्रयत्न करा. अर्थाशिवाय कोणाशीही वाद घालू नका आणि तुमच्या बोलण्यावर किंवा रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. अन्यथा, कोणाशी तरी भांडण होऊ शकते. दिवसाची सुरुवात आनंददायी होईल. दिनक्रमात बदल कराल. अति उत्साहाने कामे करू नका. भागीदारीत आंधळा विश्वास ठेऊ नका. घाईने काम बिघडू शकते.
सिंह : आज शक्य असल्यास, आपण प्रवास योजना पुढे ढकलणे आवश्यक आहे. आज भावनिकतेवर वर्चस्व गाजवू देऊ नका, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. मनाला न पटणार्या गोष्टीला होकार देऊ नका. कौटुंबिक गोष्टींसाठी खर्च कराल. तुमच्या मताला विरोध होऊ शकतो. निष्काळजीपणे वागू नका. भावनात्मक निर्णय टाळावा.
कन्या : आज तुम्ही पैशाशी संबंधित कोणतीही योजना कराल, त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. लग्न, करिअर आदींबाबतची चिंता दूर होईल. कौटुंबिक सदस्यासोबत वाद होऊ शकतो. स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा. धावपळीचे योग्य वेळी लाभ मिळतील. कामातून आनंद शोधाल. सर्वांशी प्रेमाने वागाल. प्रिय व्यक्तीची गाठ पडेल.
तूळ : कोणत्याही प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. या दिवशी तुम्हाला सल्ला दिला जातो की नशिबावर विसंबून बसू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. अघळपघळ बोलू नका. स्वच्छ व स्पष्ट मत मांडा. हातातील सर्व कामे सुरळीत पार पडतील. एखादा नवीन अनुभव गाठीशी बांधाल. जन संपर्कातून लाभ होईल.
वृश्चिक : जुना गैरसमज दूर होऊ शकतो. आर्थिक बाजूही उत्तम राखली जाईल. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चिंता दूर होऊ शकते.फसवणुकीपासून सावध रहा. झोपेची तक्रार जाणवेल. तुमचे मत विचारात घेतले जाईल. रूचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. जास्त जबाबदारी अंगावर घेऊ नका.
धनू : घरात प्रिय व्यक्तीचे आगमन सर्वांना आनंद देऊ शकते. आर्थिक बाबतीत कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. समोरच्याचा मान ठेवून वागा. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. दिग्गज मंडळींच्या भेटीचे योग येतील. काळ आणि वेळ लक्षात घ्या.
मकर : तुमचा घाईघाईने घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. आर्थिक बाजूंबाबतही काही गोंधळ होऊ शकतो. आर्थिक बाबतीत तुमचे कर्मचारी आणि सहकाऱ्यांवर आंधळा विश्वास ठेवू नका.चांगल्या कामासाठी पैसा खर्च केला जाईल. वैवाहिक सौख्यात वाढ होईल. कामे पूर्णत्वास नेण्यास प्रयत्नशील रहा. घरातील गोष्टी चिघळू देऊ नका. डोकेदुखीचा त्रास संभवतो.
कुंभ : वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही प्रकरण चालू असेल तर आजच या विषयावर संयम ठेवा अन्यथा त्रास होईल. आज तुमचे बोलणे कडू असू शकते, शब्दांचा जपून वापर करा. उत्तम लाभामुळे दिवस आनंदात जाईल. विनाकारण तर्क-वितर्क करू नका. वडीलांची साथ मोलाची ठरेल. योग्य नियोजनाने काम पूर्णत्वास जाईल. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या भेटीचा योग.
मीन : घरातील वडीलधाऱ्यांच्या तब्येतीची चिंता असू शकते. व्यवसायात नवे प्रयोग कराल, त्यामुळे फायदा होईल. जे आधीच आजारी आहेत, त्यांची तब्येत सुधारेल.बोलताना शब्दांचे थोडे भान ठेवा. एखाद्या महत्वाकांक्षी योजनेस प्रारंभ कराल. मेहनत व परिश्रम यांची कास सोडू नका. अचानक आलेल्या अडचणी संयमाने सोडवा. खर्चात वाढ होण्याची शक्यता.