मेष : जोडीदाराच्या आरोग्याबाबत समस्या उद्भवतील. पैसे अधिक खर्च होतील. आपली मानसिकता ही नकारात्मक राहणार आहे. आपल्यावर कामाचा ताण राहील. काहींचा आराम करण्याकडे कल राहील. आजचा दिवस सेवा करण्यात व्यस्त असेल. तुम्हाला काही वादविवादात सहभागी व्हावे लागण्याची शक्यता आहे. शांत राहावे.
वृषभ : व्यापारात नवीन गती मिळेल. व्यावसायिकांना आज अशक्तपणा जाणवेल. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. तुमचा बौद्धिक पराभव राहील. काहींचे वैचारिक परिवर्तन होणार आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आरोग्याबाबत जागरुक राहा. पाय दुखण्याची समस्या उद्भवू शकतात. काहींना आर्थिक लाभ होतील.
मिथुन : आज तुमची सामाजिक कार्यात रुची वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आज आपले मन विशेष आनंदी व आशावादी राहील. सार्वजनिक क्षेत्रात तुमच्या व्यक्तिमत्त्वाची नवीन ओळख निर्माण होणार आहे. आईच्या तब्येतीची समस्या उद्भवेल. खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्या. प्रवास सुखकर होणार आहेत.
कर्क : गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमचा मान, पद आणि प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभणार आहे. तुमच्यावर कामाचा ताण राहील. आपण जिद्दीने व चिकाटीने कामे पूर्ण करण्यावर भर देणार आहात. आज तुम्हाला अचानक धनलाभ होईल. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. प्रवास सुखकर होणार आहेत.
सिंह : मुलांप्रती असणारी जबाबदारी आज पूर्ण होतील. तुमचे बरेच दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. कौटुंबिक जीवनात विशेष सुसंवाद राहील. तुम्ही आज विशेष आनंदी व आशावादी राहाल. तुमच्यावर असणारा ताण आज कमी होणार आहे. डोळ्यांच्या संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवाल. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. मनोबल वाढेल.
कन्या : आजचा दिवस परोपकार आणि सेवेत व्यतीत होईल. शत्रू आज प्रबळ होतील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल असणार आहे. आपल्यावर असणारी जबाबदारी आपण पूर्ण करणार आहात. नवीन कामे हाती घेणार आहात. आज व्यवसायात काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. वडिलांचा सल्ला घ्यावा लागेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
तुळ : व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. काहींना आज मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे. आज आपल्याला काही वादविवादात सहभागी व्हावे लागेल. एखाद्या बाबतीत तुमचे मन नाराज राहील. आज तुमच्या बोलण्याचा सौम्यपणा इतर लोकांवर प्रभाव टाकेल. ज्यामुळे तुम्हाला विशेष आदर मिळेल. प्रवास टाळावेत.
वृश्चिक : नोकरी आणि व्यवसायात प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे बोलण्यात सौम्यता ठेवा. काहींना अचानक धनलाभ संभवतो. कौटुंबिक सौख्य लाभेल. तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी वेळ देऊ शकणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुमची रखडलेली कामे पूर्ण होतीना दिसतील. आळस सोडावा लागेल. तुमचा वेळ प्रियजनांसोबत घालवाल. मनोबल उत्तम राहील.
धनु : तुमचे पैसे आज अडकू शकतात. तुम्हाला अपयशाला सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे सावध राहा. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. दैनंदिन कामात सुयश लाभेल. आज तुम्हाला पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागेल. आज तुम्ही विशेष आनंदी असणार आहात.
मकर : तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. ज्यामुळे भविष्याची चिंता कमी सतावेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. तुम्हाला तुमच्या नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना बनवाल. वाहन चालवताना काळजी घ्या. खर्चात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होणार आहे.
कुंभ : मुलांची तब्येत बिघडू शकते. आज तुमचे खर्च वाढतील. पैशांचे व्यवहार काळजीपूर्वक कराल. मनोबल कमी असल्याने कामामध्ये लक्ष लागणार नाही. काहींना मानसिक अस्वस्थता असणार आहे. आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. आज तुम्हाला कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी कायदेशीर बाबींचा विचार करावा लागेल. प्रवासाचे योग संभवतात, मात्र प्रवासात काळजी हवी.
मीन : पालकांच्या सल्ल्याने आणि आशीर्वादाने व्यवसायाला भरभराटी येईल. ज्यामुळे यशाच्या पायरी सहज चढाल. तुम्ही आपल्या मतांबद्दल आग्रही राहणार आहात. मनोबल उत्तम राहील. एखादी उत्साहवर्धक घटना घडेल. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आणि बौद्धिक ओझे आज कमी होईल. संध्याकाली फिरायला जाण्याचा प्लान कराल. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.