मेष : क्षुल्लक प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवा, अन्यथा तुम्ही एखाद्या आरोपात अडकू शकता. बर्याच काळापासून रखडलेल्या गोष्टी पूर्ण होऊ शकतात आणि नोकरीच्या बाबतीत काही चांगली बातमी मिळू शकते.घरगुती प्रश्न मिटतील. साधनेला चांगला काळ आहे. केवळ कामावर लक्ष केंद्रित करावे. स्वत:वर ताबा ठेवावा.
वृषभ : कोर्ट आणि कोर्टाच्या कामात आज यश मिळण्याची अपेक्षा आहे. आज तुम्ही तुमची जबाबदारी वेळेवर पूर्ण करू शकाल. कामे जलद गतीने उरकण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावा. चांगल्या गुंतवणुकीतून लाभाचे योग. व्यापारी वर्गाला दिवस लाभदायक असेल. खादी चांगली बातमी मिळेल.
मिथुन : तुमचे उत्पन्न चांगले राहील. अयोग्य कृतींकडे लक्ष देऊ नका आणि झटपट यश मिळवण्यासाठी शॉर्टकटचा वापर करू नका.तरुण मंडळींनी फार उतावीळपणा करू नये. बदल स्वीकारावा लागेल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. वाहन विषयक अडचण मिटेल. हातात काही अधिकार येतील.
कर्क : प्रगतीसाठी नवीन मार्ग आणि पर्याय शोधणे आवश्यक आहे, तुम्हाला यश मिळेल. प्रॉपर्टी डीलरसाठी आजचा दिवस अधिक फायदेशीर आहे. पारदर्शी व्यवहार करावेत. भावंडांना सहाय्य करावे लागेल. आज एखादी आठवण जागृत होईल. विरोधक नामोहरम होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
सिंह : आज इतरांना दिलेले पैसे परत मिळू शकतात. जर तुम्ही अनावश्यक खर्चात कपात केली तर तुम्हाला फायदा होईल. अतिविचार करू नका. नवे मनसुबे यश देतील. बोलण्यातून आत्मविश्वास प्रकट कराल. आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. मित्रांची उत्तम साथ लाभेल.
कन्या : आज तुमचे मन प्रसन्न राहील. जाणकार आणि ज्येष्ठ लोकांसोबत काम करण्याची संधी सोडू नका. यावेळी व्यापार्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.कलाकार मंडळींना वेगळा दर्जा मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील. झोपेची तक्रार जाणवेल. कागदपत्रे नीट जपून ठेवावीत. घराबाहेर सावधानतेने वावरावे.
तूळ : आज तूळ राशीच्या लोकांनी इतरांशी राजकारण करण्यापासून दूर राहून आपल्या कामात लक्ष घालावे.महिला वर्ग खुश राहील. मनातील प्रबळ इच्छा पूर्ण होईल. टीमवर्क उपयोगाला येईल. नवीन विचार जाणून घेता येतील. शुभ वार्ता मिळतील.
वृश्चिक : आज ऑनलाइन खरेदी करून तुम्ही तुमच्या मनाचे मनोरंजन करू शकता. झटपट पैसे मिळवण्यासाठी चुकीच्या योजनेत भांडवल गुंतवू नका आणि सावध रहा. कामात अधिक उत्साह वाटेल. कमिशनच्या कामातून चांगली कमाई कराल. दिवसाची सुरुवात व्यस्त राहील. लाभाच्या अनेक संधी चालून येतील. मनातील चिंता दूर होईल.
धनू : तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधी देखील मिळू शकतात आणि व्यावसायिकांचे नशीब आज तुमची साथ देईल. तुम्हाला सामाजिक आघाडीवर नेटवर्किंगचा फायदा होईल खाण्या-पिण्याचे पथ्ये पाळावीत. निर्णय उत्स्फूर्तपणे घेतले तर फळाला येतील. ज्येष्ठांशी सुसंवाद साधावा. सहकार्यांशी वाद घालू नये. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.
मकर : रिअल इस्टेटशी संबंधित लोक सवलत देऊ शकतात आणि त्यांचे काम वाढवू शकतात. व्यवसायात कोणतेही बदल करण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला घ्यावा.जुने व्यवहार लाभ देतील. काळाची पाऊले ओळखावीत. घरगुती वादविवादात अडकू नका. कामातील प्राधान्य जाणून घ्यावे. धार्मिक कामात मन रमवाल.
कुंभ : काही नवीन काम सुरू करण्याचा निर्णय घ्याल. आर्थिक कामात एकाग्रतेने मन शांत राहील आणि यश मिळेल.जोडीदाराची प्रगती होईल. चर्चेतून नवकल्पना सुचतील. करमणूक प्रधान गोष्टी कराल. भेटवस्तू देताना खर्चाचा विचार कराल. सहकार्यांना सोबत कराल.
मीन : जर तुम्ही ऑनलाइन व्यवसाय करत असाल तर व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन योजना कराव्यात. रखडलेली योजना पुन्हा सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे आणि तुम्हाला त्यात फायदा होईल.उत्साहाने कार्यरत राहाल. दिवसाची सुरुवात धीम्यागतीने होईल. समस्यांचे निराकरण होईल. कौटुंबिक वादात पडू नका. स्वभावात उधळेपणा येईल.