TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात परंपरागत उत्सवाची जागा धोक्यात? नागरिकांचा संताप आणि मुख्याधिकारी यांना निवेदन..

परंपरा जपण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची चेतावणी

vijay waghmare by vijay waghmare
September 26, 2025
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव शहरातील सर्वांचे ग्रामदैवत आईमरी देवी मंदिरासमोरील परंपरागत पवित्र जागेवर नगरपालिकेच्यावतीने सुरू करीत असलेल्या बांधकामामुळे समस्त धरणगाव शहर व परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सदरील नियोजित जागेवर होत असलेल्या पाण्याची टाकी (जल कुंभ), आणि उद्यान (बगीचा) होऊ नये, यासंदर्भात धरणगाव नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी मा. रामनिवास झंवर यांना समस्त माळी समाज, पाटील समाज, तेली समाज, मराठे समाज, जागृती युवक मंडळ, रावण दहन समिती, पंच मंडळ, आणि शहरातील सुज्ञ नागरिकांनी निवेदन सादर केले.
आईमरी मंदिर समोरील, व छ.शिवाजी महाराज तलाव तलावाच्या पूर्वेस असलेल्या जागेवर शासनाच्या माध्यमातून होत असलेल्या पाण्याची टाकी, व उद्यान तयार करीत असल्याचा आराखडा आहे. परंतु शेकडो वर्षांची परंपरागत मरीआई संस्थांच्या वतीने दरवर्षी श्रावण महिन्यात एक महिनाभर यात्रा भरते. तसेच, शेकडो वर्षांपासून सुरू असलेली रावण दहनाची परंपरा येथे टिकून असल्याने संपूर्ण गावातील लोकं मिळून ह्याच जागेवर रावण दहन केले जाते. सदरील रावण दहन व यात्रेच्या जागेवर यात्राप्रसंगी पूजेची दुकाने, खेळणी, संसारोपयोगी साहित्य, लहान-मोठी दुकाने लावली जातात, यांसह पाळणा घर केले जाते. त्याचप्रमाणे इतर दुकानदार, व्यावसायिक यांना उदर-निर्वाहसाठी देखील आईमरी यात्रेची शोभा वाढवितात. म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून गावकऱ्यांचे धार्मिक पूजाअर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम, यात्रोत्सव आणि पारंपरिक उत्सव पार पडत आले आहेत. मात्र, शासनाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या या पावलामुळे शेकडो वर्षांची परंपरा धोक्यात येईल अश्या भीतीपोटी सदरील कामाला आमचा संपूर्ण समाजाचा विरोध आणि हरकत आहे. तरी शासन प्रशासनाने आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल घेत सहकार्य करावे.

▪️सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेली जागा..

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 14 फेब्रुवारी 2026 !

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

या ठिकाणी दरवर्षी समस्त माळी समाज, पाटील समाज, तेली समाज, मराठे समाज, जागृती युवक मंडळ, आई मरी संस्थान अध्यक्ष व पंच मंडळ तसेच विविध सामाजिक संस्था उत्सव साजरे करतात. ही जागा केवळ धार्मिक नसून सामाजिक एकतेचे व बंधुभावाचे प्रतीक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

▪️उद्घाटन/भूमिपूजन तातडीने थांबवा, अन्यथा आंदोलन

नागरिकांनी निवेदनात म्हटले आहे की, “ही जागा जनतेची असून येथे कोणतेही शासकीय बांधकाम आम्हाला मान्य नाही. बांधकाम सुरू राहिल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.” प्रशासनाने सदरील जागा मूळ स्वरूपात कायम ठेवावी, अशी सर्व समाजांची एकमुखी मागणी आहे.
निवेदन सादर प्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कडू महाजन, माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे, चुडामण पाटील, राजेंद्र चौधरी, किशोर महाजन, भीमराज पाटील, राजेंद्र वाघ, आनंद पाटील, गोरख महाजन, गोपाल पाटील, गोरख देशमुख, मधुकर पाटील, प्रवीण महाजन, विजय पाटील, हेमू चौधरी, महिपत चौधरी, भैय्या मराठे आदींसह असंख्य नागरिक उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 14 फेब्रुवारी 2026 !

February 14, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 फेब्रुवारी 2026 !

February 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

February 12, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

February 11, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 27 सप्टेंबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतमातेच्या रक्षणासाठी वक्फ कायद्याचे दहन अत्यावश्यक : प्रशांत जुवेकर !

May 2, 2023

गेल्या 24 तासांत देशात 43 हजार 733 नव्या कोरोना रुग्णांची नोंद !

July 7, 2021

कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्न परवाना नोंदणी शिबिर

October 1, 2021

ब्रेकिंग न्यूज : शरद पवारांना मोठा धक्का ; राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द !

April 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group