भुसावळ (प्रतिनिधी) जिल्हा पोलिस दलातील सात पोलिस निरीक्षकांसह सात सहाय्यक निरीक्षक व एका पोलिस उपनिरीक्षकांची जळगाव पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी गुरुवार, 25 जानेवारी रोजी बदल्या केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बदल्या करण्यात आल्या आहेत. महत्वपूर्ण मानले जाणारे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी भुसावळ बाजारपेठचे बबन आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बाजारपेठ पोलिस निरीक्षकपदी शहर ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यात नव्यानेच अहमदनगर येथून दाखल झालेले मधुकर साळवे यांची चोपडा शहर प्रभारी नाशिक ग्रामीण येथून दाखल झालेले विकास देवरे यांची अमळनेर प्रभारी नाशिक ग्रामीण येथून दाखल झालेले सुनील पाटील यांची भडगाव प्रभारी नाशिक ग्रामीण येथून दाखल झालेले संदीप रणदिवे रामानंद प्रभारी बाजारपेठचे बबन आव्हाड एमआयडीसी प्रभारी भुसावळ शहरचे गजानन पडघण यांची बाजारपेठ प्रभारी अमळनेरचे विजय शिंदे नियंत्रण कक्षात चोपडा शहरचे सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण अडावद प्रभारी गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत यांची कासोदा प्रभारी नाशिक ग्रामीणहून आले.
सहाय्यक निरीक्षक प्रकाश काळे यांची पिंपळगाव हरेश्वर प्रभारी पिंपळगाव हरेश्वरचे सहाय्यक निरीक्षक महेंद्र वाघमारे यांची एमआयडीसी प्रभारी धुळ्याहून आलेले सहाय्यक निरीक्षक गणेश फड यांची नियंत्रण कक्ष अहमदनगर येथून आलेल्या सहाय्यक निरीक्षक तेजश्री पाचपुते यांची नियंत्रण कक्ष नाशिक ग्रामीणहून आलेल्या सहाय्यक निरीक्षक कल्याण वर्मा यांची जळगाव शहर पोलिस ठाण्यात