TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वीर जवान सागर धनगर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
February 2, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘वीर जवान सागर धनगर अमर रहे’ ‘भारत माता की जय’ च्या जयघोषात वीरजवान सागर धनगर यांच्या पार्थिवावर आज सकाळी दहा वाजता त्यांच्या मूळगावी तांबोळे बुद्रुक, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवानाला शेवटचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जवान सागर धनगर हे ५, मराठा इन्फ्रंटी बटालियनमध्ये सेनापती (मणिपूर) येथे कार्यरत होते. रविवार, ३१ जानेवारी, २०२१ रोजी सेनापती (मणिपूर) येथे त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या पार्थिवावर आज तांबोळे बु. येथे शोकाकुल वातावरणात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरुवातीस वीरजवान सागर धनगर यांच्या पार्थिवास सैन्य दलाच्या जवानांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर आमदार मंगेश चव्हाण, उप विभागीय अधिकारी कचरे, तहसिलदार मोरे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. या वीर जवानावर शासकीय इतमामात गावापासून जवळच असलेल्या तांबोळे टेकडी येथे मोकळ्या जागेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान सागर धनगर यांचा चुलत भाऊ देवेंद्र धनगर याने भावाच्या पार्थिवाला अग्नीडाग दिला. यावेळी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण, तहसीलदार अमोल मोरे, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ठेंगे, सैन्य दलातील मराठा बटालियनचे सुभेदार संपत आमले, हवालदार रोहिदास पाटील, भैय्यासाहेब पाटील व खानदेश रक्षक ग्रुपसह इतर विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. अग्निडाग देण्यापूर्वी जवान सागर धनगर यांना सैन्यदल व पोलिसांतर्फे हवेत बंदुकीच्या गोळ्या झाडून मानवंदना देण्यात आली.

READ ALSO

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

तत्पूर्वी सकाळी सागर यांचे पार्थिव त्यांच्या मुळगावातील घरी आणण्यात आले. कुटूंबिय व नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून शोकाकूल वातावरणात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. फुलांनी सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा तांबोळे बुद्रुक गाव व परिसरातून मोकळ्या मैदानात आली. अंतयात्रेच्यापुढे तिरंगा धरलेले तरुण चालत होते. वीर जवान यांच्यामागे आई रत्नाबाई धनगर, भाऊ अशोक असा परिवार आहे. यावेळी अनेक मान्यवर व्यक्ती, संस्थांच्यावतीने वीरजवान सागर धनगर यांना श्रध्दांजली अर्पण करुन अभिवादन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ४६ कोरोनाबाधित, ४५ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव एनएसयुआयने साजरा केला राष्ट्रीय बेरोजगार दिन !

September 17, 2020

कोर्टाच्या निर्णयानंतर आतातरी सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा : सुप्रिया सुळे

January 12, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 29 मार्च 2025

March 29, 2025

न घडलेल्या अपमानावर काहूर माजवणे हा सुद्धा तिरंग्याचा अपमान : शिवसेना

February 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group