जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे आदिवासी विकासमंत्री ॲड के. सी. पाडवी हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा गुरुवार व शुक्रवार रोजीचा दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
गुरुवार रोजी दुपारी ४ वाजता नंदुरबार येथून जळगावकडे शासकीय वाहनाने प्रयाण व अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन व मुक्काम असणार आहे. शुक्रवार, दिनांक ६ नोव्हेंबर, २०२० रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे प्रकल्प अधिकारी यांच्यासमवेत जिल्ह्यातील आदिवासी उपाययोजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेर राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक होणार आहे. तसेच दुपारी ४ वाजता जळगाव येथून रावेरकडे प्रयाण करणार आहेत, सायं ६ वाजता रावेर येथील बोरखेडा रस्त्यावरील हत्याकांडातील पीडित कुटुंबाची आदिवासी विकास विभागाच्या वसतीगृह येथे भेट घेणार आहे. सांय. ७ वाजता रावेर येथून जळगावकडे प्रयाण व सोईनुसार जळगाव येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.