जळगाव (प्रतिनिधी) दिल्ली येथे कृषी कायद्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी जळगाव नंदुरबार येथील १२२७ महिला व पुरुष शेतकरी जळगाव येथून रवाना झाले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयापासून रेल्वे स्टेशन पर्यंत यांची रॅली काढण्यात आली व त्या रॅलीच्या माध्यमाने त्यांनी घोषणा देत रेल्वे स्टेशन गाठले.
मुकूंद सपकाळे, सचिन धांडे, फारूक शेख, प्रा. प्रितीलाल पवार ,संजय महाजन, हरिश्चंद्र सोनवणे, भरत कर्डिले, अमोल कोल्हे, श्रीकांत मोरे, प्रदीप बारेला, क्रिष्णा सपकाळे, ताराचंद बारेला, गेमा बारेला, नारायण बारेला, भारत सोनवणे, डिंगबर सोनवणे, मुसमाबाई पावरा, पीनाबाई बारेला, नानबाई पावरा ,निशांत मगरे चंदन बिर्हाडे, अकीलखान ईस्माईलखान, रेहान सय्यद रॅली सहभागी होते.
जळगाव येथून विविध रेल्वेने १२२७ शेतकरी रवाना
दुपारी गोवा एक्सप्रेस, झेलम एक्सप्रेस, संध्याकाळची सचखंड व रात्रीचे पंजाब एक्सप्रेस ने हे सर्व शेतकरी रवाना झाले असून ते दिल्ली येथे १६ जानेवारी ते २६ जानेवारी पर्यंत दहा दिवस शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवतील व आंदोलनात आपला सहभाग नोंदवतील.
विविध संस्था व संघटनांचे सहकार्य
या शेतकर्याना जळगाव येथे जेवण, सोबत जेवणची पाकिटे, अंगावर स्वेटर, व तिकिटांची व्यवस्था काही संस्थांनी स्वयंस्फूर्तीने केली.