चोपडा (प्रतिनिधी) चोपडा शहर पोलिसांनी जिल्ह्यात सापळा रचत सात गावठी पिस्तुलांसह दोन पंजाबी तरुणांना अटक केली आहे.
चुंचाळे तालुका चोपडा या गावी बस स्टैंड वर सापळा रचला थांबले असता बातमी प्रमाण बलवाडी ते चोपडा एसटी बस क्रमांक एम. एच. ४० एन ९०६४ या बसमध्ये दोन इसम त्यातील एकाने अंगातील हिरवट रंगाचे जॅकेट व लाल काळया रंगाचे पॅन्ट तसेच दुसऱ्याने काळपट निळ्या रंगाचे जॅकेट व भुरसट रंगाचे जॅकेट असे कपडे परिधान केलेले अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील दोन तरूण मिळून आल्याने त्यांना सदर एसटी बस मधून खाली उतरून पंचा समक्ष नाव विचारपूस केली. असता त्यांनी त्यांची नावे दीपक विजय वर्मा वय ३६ वर्ष राहणार हाँगवल खुर्द तालुका जिल्हा लोधियाना पंजाब, बलजीतसिंग सारबन सिंग सरदार वय २८ वर्ष रा. बस्ती बाजी गड अहियापुर उरमर हुशियारपूर पंजाब असे सांगितले. त्यांची पंच समक्ष अंगझडती घेता त्यांच्या कब्जात एकूण आठ गावठी बनावटीचे पिस्टल म्हणजेच एकटे मिळून आले. त्यात ६० हजार रुपये किमतीच्या दोन गावठी बनावटीचे पिस्टल व मॅगझिन्स रिकामे किट बलजीत सिंग सारबनसिंग सरदार याच्या अंगझडती मिळून आले. तर दीपक विजय वर्मा यांच्या अंगझडती एक लाख ५० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पाच पिस्टल म्हणजेच कट्टे मॅक्झिन सह आढळले. तसेच दोघांच्या अंगझडती मध्ये एकूण दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल म्हणजेच कट्टे आढळून आल्याने तालुक्यात जोरदार चर्चेला उधाण आले आहे.
तसेच १७००० रुपयाचे मोबाइल हँडसेट १५३० रुपये रोख असा एकूण दोन लाख २८ हजार ५३० रुपयाच्या चोपडा शहर पोलिसांनी जप्त केला. ऐवज चोपडा शहर पोलिस यांनी जप्त केला आहे. तरी १९ डिसेंबर रोजी च्या सकाळी सात वाजेच्या सुमारास चुंचाळे तालुका चोपडा गावी बस स्टँड वर दीपक विजय वर्मा लुधियाना पंजाब व बलजीत सिंग सारबनसिंग सरदार होशियारपुर पंजाब वरील तरुण मुद्देमाल सह त्यात गावठी बनावटीचे एकूण सात पिस्टल विनापरवाना बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आले. असून सदर त्यांचा विरुद्ध पो ना विलेश विश्वासराव सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला भाग-६ गु र नं ३१ ४२/ २०२० भारतीय हत्यार कायदा कलम ३/ २५, ५ (१) (अ) ७/ २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याच्या पुढील तपास पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाने चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण करीत आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यांनी केली कारवाई
दि. १९ डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक जळगाव, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, उपविभागीय पोलिस अधिकारी चोपडा भाग चोपडा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजित सावळे, पो ना विलेश सोनवणे, पोहेका सुनील पाटील, पो ना संतोष पारधी, पो ना शेषराव पोलीस, पो ना ज्ञानेश्वर जवागे, पो ना जयदीप राजपूत, पो ना वेलचंद पवार, पोहेका जितेंद्र सोनवणे, पो ना प्रदीप राजपूत, पो का प्रकाश मथुरे, पो का नितीन कापडणे, पो का मिलिंद सपकाळे, पो का सुभाष सपकाळ, पो का योगेश शिंदे, पो का रवींद्र पाटील, प्रमोद पवार अश्यानी कारवाई केली आहे.