जळगाव (प्रतिनिधी) येथील अग्रवाल चौकात दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली. यात एक तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, शहरातील मुंदडा नगरातील रहिवासी रमेश पुंडलीक सेानार (वय-६७) त्यांच्या दुचाकी (एमएच.१९.डी.ए.७३३८) ने रुबी हॉस्पीटल जवळून जात असतांना समोरुन सुसाट वेगात आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या वाहनाला धडक दिली. अपघातात रमेश सेानार जखमी झाले असून त्यांच्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.