एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील कासोदा येथे सेंट्रल बँकच्या शाखेमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात पसरेल एवढी गर्दी होत आहे. याठिकाणी नागरिकांनी कुठलेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याचे चित्र दिवसभर होते.
कासोदा लगत गावातील व खेड्यातील नागरिक येथे येतात. त्यामुळे अशा गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची संभावना दिसत आहे. त्यासाठी बँक व स्थानिक प्रशासनाने गर्दीला आळा घालण्यासाठी ठराविक अंतर व सोशल डिस्टंसिंगचे पालनकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. मात्र नागरिकांनी येथे गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडालेला दिसून आला.