धुळे (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी वांद्रे येथील सभेत भाजपवर केलेल्या टीकेनंतर भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan यांनी प्रतिउत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे हे सत्ता लंपट झाले आहेत. त्यांना फक्त त्यांची खुर्ची जपायची आहे. त्यामुळे त्यांना औरंगजेबच्या कबरीवर जाऊन पाया पडा, नमाज पडा किंवा फुले वाहा, उद्धव ठाकरेंना काहीच फरक पडत नाही, असं गिरीश महान म्हणालेत.
गिरीश महाजन हे धुळ्यामध्ये महापौर प्रदीप कर्पे यांच्या मुलाच्या लग्न सोहळामध्ये उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. ‘शिवसेना म्हणजे गटारातील मेंडक आहे, यांनी जगात काय चालले आहे ते बघावं, संपूर्ण देश मोदीजींकडे बघतो आहे, मोदीजींवर बोलण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही आणि मोदींना तुमच्यासारख्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही’, असे म्हणत गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अटलजींची भाजप उरली आहे का, या प्रश्नावर उत्तर दिलं.
‘उद्धव ठाकरे हे सत्ता लंपट झाले आहेत. त्यांना फक्त त्यांची खुर्ची जपायची आहे. ते सत्ता लंपट झालेले आहेत. त्यामुळे त्यांना औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन पाया पडा, नमाज पढा किंवा फुलं वाहा उद्धव ठाकरेंना काहीच फरक पडत नाहीये. भोंग्यांच्या प्रश्नावर ते एक शब्दही बोलायला तयार नाहीत आणि हनुमान चालिसाच्या मुद्द्यावर देखील एक शब्द देखील बोलायला ते तयार नाहीये. यामुळे त्यांच हिंदूत्व किती बेगडी आहे हे सर्वांच्या लक्षात आल आहे’, असा घणाघात गिरीश महाजनांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभेमध्ये भाजपला गधाधारी म्हणत निशाणा साधला होता आणि याच्यावर प्रत्युत्तर देताना माजी मंत्री गिरीश महाजन म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंनी आता जनतेसमोर जावं आणि जेव्हा निवडणुका होतील तेव्हा जनता त्यांना कोण गधाधारी हे दाखवून देईल’.