औरंगाबाद (वृत्तसंस्था) ‘राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असं म्हणालोच नव्हतो’, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा रद पवार यांनी दिले. तसेच, ‘येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढावे, अशी माझी इच्छा आहे’, असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.
राज्यातील राजकीय परिस्थितीवर पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाऊ अशी इच्छा होती, पण तशी चर्चा झाली नाही. परंतू महाविकास आघाडी सरकारने एकत्र लढावे ही माझी वैयक्तिक ईच्छा आहे असे स्पष्ट मतही त्यांनी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत व्यक्त केले. ‘सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे काय होणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पण, पुढील काळात येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात अशी आपली इच्छा आहे. मात्र हे निर्णय बसून चर्चेतून घ्यावे लागतील, याबाबत आमच्या तीन पक्षांची चर्चा झालेली नाही,’ असंही त्यांनी नमूद केलं.
2019 मध्ये राष्ट्रवादीच्या काही लोकांनी त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न केला होता, पण मी त्यांना जाऊ दिलं नाही,’ असं पवार म्हणाले. पवार म्हणाले, सत्ता हातातून गेली तेव्हा काहीजण अस्वस्थ होते पण आता त्यांच्याकडे सत्ता आल्याने त्यांचे अस्वस्थपण कमी झाले असावे असे मी मानतो. काही जण रात्री भेटत होते ते त्यांनी सांगितले, फडणवीसांच्या पत्नींनीही सांगितले म्हणजे त्यात तथ्य असेल.