नवी दिल्ली वृत्तसंस्था । आपल्या जिद्द आणि साहसाच्या जोरावर इंग्रजांना हादरवून टाकणाऱ्या शहीद भगत सिंह यांचा आज जन्मदिवस आहे. 28 सप्टेंबर 1907 मध्ये झाला होता तर 23 मार्च 1931 रोजी भारतमातेचा हा सुपुत्र हसत हसत फासावर गेला. यानिमित्ताने सोशल मिडियावर विविध पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
इंग्रजांचा विरोध करत आणि तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवणाऱ्या भागात सिंग यांच्या नसा-नसात देशभक्ती आणि क्रांती होती. याच त्यांच्या देशभक्तीला आज देशातीळ तरुणांनी ट्विटरवरून वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे. भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू या तीन तरुणांना तत्कालीन ब्रिटिश सरकारने फासावर लटकावले. त्यांच्या या समर्पणाला देशभरातून स्मरण करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी भगत सिंग यांना नमन केले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर शहीद भगत सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्यासाठी ट्विटरवर #Bhgatsingh असा ट्रेंड सुरु आहे.