TheClearNews.Com
Tuesday, February 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणकडून अचूक मीटर रीडिंगसाठी विविध उपाययोजना ; ४७ एजन्सीज बडतर्फ

The Clear News Desk by The Clear News Desk
June 17, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) लघुदाब वर्गवारीतील सुमारे २ कोटी १५ लाख ग्राहकांना वीजवापराप्रमाणे अचूक मीटर रीडिंगचे बिल देण्यासाठी महावितरणने गेल्या फेब्रुवारीपासून विविध उपाययोजनांना सुरवात केली आहे. यामध्ये हेतुपुरस्सर चुका व अचूक रीडिंगमध्ये हयगय केल्याचे आढळून आल्याने राज्यातील तब्बल ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना बडतर्फ करण्यात आले आहे. यातील ८ एजन्सीजना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. या धडक उपाययोजनांमुळे मीटर रीडिंगच्या बाबतीत ग्राहकांच्या तक्रारींमध्ये मोठी घट झाली असून महावितरणच्या महसूलात देखील वाढ झाली आहे.

वीजगळती कमी करण्यासोबतच ग्राहकहिताच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत महावितरणने ग्राहकाभिमुख सेवेच्या सुधारणांना मोठा वेग दिला आहे. यात अतिशय महत्वाच्या बिलिंगसाठी वीजमीटरच्या अचूक रीडिंगला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. याबाबतीत आढावा घेताना १०० टक्के अचूक मीटर रीडिंग अपेक्षित असताना त्यात हयगय होत असल्याचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांना आढळून आले. या प्रकाराची त्यांनी गंभीर दखल घेतली व महावितरणच्या इतिहासात प्रथमच राज्यातील थेट सर्व मीटर रीडिंग एजन्सीजचे संचालक तसेच क्षेत्रीय उपविभाग कार्यालयांचे प्रमुख व लेखा अधिकारी यांची व्हीसीद्वारे ताबडतोब आढावा बैठक घेतली होती. ‘कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीजमीटरचे रीडिंग १०० टक्के अचूक झालेच पाहिजे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व बिल दुरुस्तीचा त्रास तसेच महावितरणच्या महसूलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही. मीटरचे अचूक रिडींग घेण्यात हयगय करणाऱ्या एजन्सीजविरुद्ध कारवाई करावी’ असे निर्देश त्यांनी दिले होते.

READ ALSO

पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

शहरात दोन ठिकाणी धुमस्टाईलने लांबवल्या सोनपोत

त्याप्रमाणे गेल्या फेब्रुवारीपासून मुख्यालय व क्षेत्रीय कार्यालयांनी एकत्रितपणे पर्यवेक्षणातून मीटरच्या अचूक रीडिंगसाठी धडक उपाययोजनांना सुरवात केली आहे. महावितरणच्या सुमारे २ कोटी १५ लाख लघुदाब ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग कंत्राट पद्धतीच्या एजन्सीजद्वारे करण्यात येते. या एजन्सीजने काढलेल्या मीटर रीडिंगच्या फोटोची खातरजमा व पडताळणी करण्यासाठी मुख्यालयात यापूर्वीच स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाने केलेल्या पडताळणीमध्ये मीटर रीडिंगचे फोटो अस्पष्ट असणे, फोटो व प्रत्यक्ष रीडिंगमध्ये तफावत असणे तसेच रीडिंग न घेता आल्याचा हेतुपुरस्सर शेरा देणे आदी प्रकार आढळून येत आहे. त्याप्रमाणे संबंधित रीडिंग एजन्सीच्या कामामध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. परंतु हयगय कायम राहिल्यास एजन्सीजविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.

गेल्या चार महिन्यांमध्ये मीटर रिडींगच्या कामामध्ये हयगय करणाऱ्या तब्बल ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना बडतर्फ करण्यात आले आहे. यामध्ये नांदेड परिमंडलातील १०, जळगाव- ८, अकोला- ७, लातूर, कल्याण, बारामती व नाशिक- प्रत्येकी ४, औरंगाबाद- २, तसेच पुणे, चंद्रपूर, कोकण व अमरावती या परिमंडलातील प्रत्येकी एका एजन्सीचा समावेश आहे. यातील ८ एजन्सीजना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल हे दर पंधरवड्याला प्रामुख्याने अचूक मीटर रीडींग संदर्भात आढावा घेत आहेत. मुख्यालयासोबतच क्षेत्रीयस्तरावरील विविध उपाययोजना तसेच कामात कुचराई करणाऱ्या एजन्सीजविरुद्ध सुरु असलेली कारवाई यामुळे अचूक मीटर रीडिंगमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांना रीडिंगनुसार वीजवापराचे योग्य वीजबिल मिळत असल्याने त्यांच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. सोबतच गेल्या एक महिन्यात वीजविक्रीमध्ये १९९ दशलक्ष युनिटने म्हणजेच १४० कोटी रुपयांनी महावितरणच्या महसूलात वाढ झाली आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणकडून गेल्या दीड वर्षांमध्ये वीजग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी तसेच कंपनीच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी विविध स्तरांवर प्राधान्याने कामे करण्यात येत आहेत. यामध्ये वीजचोरीविरोधी मोहीम, कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२०, सौर कृषिपंप योजना, वीजबिल वसूली मोहीम आदींचा समावेश आहे. त्याची फलश्रुती म्हणून वीजहानी कमी व महसूलात ऐतिहासिक वाढ करण्यात तसेच वीजग्राहकांना तत्पर सेवा देण्यात महावितरणला यश प्राप्त झाले आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी गुरुवारी (दि. १६) मीटर रीडिंगचे फोटो घेण्यामध्ये आणखी सुधारणा आवश्यक असलेल्या ३vi२ उपविभाग कार्यालयप्रमुख तसेच सर्व १४७ विभाग कार्यालयप्रमुख अभियंत्यांशी व्हीसीद्वारे थेट संवाद साधला. ‘मीटरचे फोटो रीडिंग घेण्याची प्रक्रिया स्वतंत्र मोबाईल अॅपद्वारे सोपी व वेगवान झालेली आहे. प्रत्येक मीटरच्या रीडिंगसाठी एजन्सीजना चांगला मोबदला दिला जातो. तरीही मीटरचे चुकीचे रिडींग घेणे व फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा शेरा देणे आदी प्रकार होत असल्यास ते खपवून घेतले जाणार नाही’, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. सोबतच सर्व ग्राहकांना अचूक वीजबिल देण्यासाठी सातत्याने पर्यवेक्षण व स्थानिक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी महावितरणच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

February 24, 2026
गुन्हे

शहरात दोन ठिकाणी धुमस्टाईलने लांबवल्या सोनपोत

February 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 फेब्रुवारी 2026 !

February 24, 2026
गुन्हे

महिलेचा विनयभंग ; मुलास जिवे ठार मारण्याची धमकी

February 23, 2026
जळगाव

क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स” उत्साहात संपन्न

February 22, 2026
जळगाव

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

February 21, 2026
Next Post

राज ठाकरेंना दिलासा ; चौदा वर्षापूर्वीच्या प्रकरणातील अटक वॉरंट रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई; मारवड पोलीसात गुन्हा दाखल

October 6, 2024

जळगाव जिल्ह्यात २८ ते ३० मार्च या कालावधीत विशेष निर्बंध ; जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

March 26, 2021

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत एक लाखापेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात

April 23, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ३० एप्रिल ते ६ मे २०२३ !

April 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group