पिंप्री खु. ता.धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दि. 22 रोजी सकाळी दहा वाजेपासून भजनासह विविध धार्मिक कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे आयोजन श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच बजरंग ग्रुप ,राम राज्य ग्रुप, शिवजयंती उत्सव समिती यांच्यावतीने विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने श्रीराम मंदिररावर तसेच राम मंदिर परिसरात देखील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी आपापल्या घरी विद्युत रोषणाई देखील केलेली आहे. गावात प्रत्येक घरी जय श्रीराम नाव टाकून संपूर्ण गाव राममय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच दुपारी दोन वाजेपासून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून समस्त गावकऱ्यांनी यात सहभाग घ्यावा, असे रामभक्तांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.