धरणगाव (प्रतिनिधी) येथील समस्त माळी समाज पंच मंडळाचा वतीने सालाबादा प्रमाणे आज दि. १६ जुलै रविवार रोजी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.
सर्वप्रथम आज सकाळी समाज भवनात संत सावता महाराज यांची मुर्तीची अध्यक्ष व पंच मंडळ तसेच समाज बांधवाच्या उपस्थितीत विधीवत पूजन करण्यात आले. यानंतर दुपारी महाप्रसादाच्या कार्यक्रम संपन्न झाला. तर सायंकाळी 6 वाजता संत सावता महाराज यांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी लेझिम पथकासह टाळकरी भजनी मंडळ सहभागी झाले होते. सदर मिरवणूक समाज मंदीरा पासून प्रारंभ होऊन गबा नंद महाजन चौक, लहान माळी वाडा परीसर, तेली विहीरी, चौकातून तेली तलाव जवळच्या सिद्धी हनुमान मंदीरा जवळ आरती होऊन समारोप करण्यात आला.
या प्रसंगी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, जेष्ठ पत्रकार कडू महाजन, विलास महाजन कोषाध्यक्ष राजेंद्र महाजन, पुंडलीक महाजन, गुलाब महाजन, दिपक महाजन, भटूलाल महाजन, नाना महाराज, धिरज महाजन, रघुनाथ महाजन, गणेश पाटील, परशुराम पाटील, भैय्या पाटील, गोरख महाजन, दिलीप महाजन यांच्यासह माळी, पाटील, तेली समाज तसेच मराठे समाजाचे पंच मंडळ व समाज बाधव उपस्थित होते.