अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील अल्पावधीतच प्रति शेगाव म्हणून नावारूपास आलेले मुंदडानगर येथील संत गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून अभिषेक व पाद्यपूजन नितीन महाराज भावे यांनी केले. सकाळी मंदिरात २१ व्या अध्यायाचे गजानन पहिला भक्त यांनी सामूहिक वाचन केले.
यावेळी संत गजानन महाराजांची महाआरती करण्यात आली. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर दुपारी एक वाजता ह.भ.प राजधर आबा महालपुरकर यांचे श्रीकृष्ण लीला वर प्रवचन करण्यात आले. संत गजानन महाराज मंदिरात अनेक गजानन भक्तांनी दर्शन घेऊन आनंद द्विगुणित केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आर.बी पवार, ज्योती पवार, महेश पाटील, परेश पाटील, सेवेकरी रघुनाथ पाटील, मोहित पवार, श्रीकृष्ण चव्हाण, चेतन उपासणी, प्रवीण पवार, आनंद पाटील, एल.जे चौधरी, अनेक गजानन भक्तासह सरला चव्हाण इंदिरा येवले, शोभा कोळी, मंगला धनगर, वंदना भारती, मंगला पाटील, बबिता पवार, मनिषा चव्हाण, संगिता पाटील, रंजना बाविस्कर, सिमा साळुंखे, सुनिता बोरसे, वैशाली गोसावी, ज्योती माळी, निर्मला पाटीलसह अनेक महिला उपस्थित होत्या.