गुवाहाटी (वृत्तसंस्था) आपण शिवसेनेचे ३९ आमदार आणि ११-१२ अपक्ष आमदार असे मिळून त्यांना आपण पुरे आहोत. त्यांनी वर्षा सोडली, आमदार सोडले, पण शरद पवारांना काही सोडायला तयार नाहीत, अशी टीका मंत्री आणि बंडखोर आमदार गुलाबराव पाटलांनी केली आहे. मंत्री आणि बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी गुवाहाटीत बंडखोर आमदारांशी संवाद साधतांना बोलत होते.
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, संजय राऊतांनी ४७ डिग्री सेल्सियस तापमानात जळगावमध्ये येऊन ३५ लग्न लावावे, मी बहाद्दर समजून घेईल. ज्यावेळी रात्री १२ वाजता रक्ताची गरज भासते, तेव्हा आमचा मोबाईल कधीच बंद नसतो. कार्यकर्त्यांच्या वेळीप्रसंगी आम्ही त्यांच्यासोबत असतो. आपण शिवसेनेचे ३९ आमदार आणि ११-१२ अपक्ष आमदार असे मिळून त्यांना आपण पुरे आहोत. त्यांनी वर्षा सोडली, आमदार सोडले, पण शरद पवारांना काही सोडायला तयार नाहीत, अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली.
गुलाबराव पाटलांना आम्ही पानटपरीवर बसवू, असं संजय राऊत म्हणाले. मात्र त्यांना हा पानटपरीवाला कधी चुना लावून जाईल हे त्यांना कळणार नाही, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. आपल्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. पण आपण सर्व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादमुळे या पदापर्यंत पोहचलो. पण आमची स्टोरी जर संजय राऊतांना सांगितली, तर १९९२च्या दंगलीत आम्ही तीघं भाऊ आणि माझे वडील जेलमध्ये होतो. तेव्हा संजय राऊत कुठे होते माहिती नाही, असा सवालही गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.