खामगाव (वृत्तसंस्था) जळगाव जामोद तालुक्यातील हनवतखेड येथे सर्पदंशामुळे २२ वर्षीय गर्भवती महिलेसह गर्भातील चार महिन्यांच्या अर्भकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
हनवतखेड येथे ९ ऑगस्ट रोजी दुपारी फुलाबाई सुनील डावर घरात काम होत्या. त्याचवेळी विषारी सापाने अचानक त्यांना दंश केला. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. यामुळे महिलेच्या गर्भात असलेल्या चार महिन्यांच्या अर्भकाचासुद्धा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली होती.