बोदवड (प्रतिनिधी) शहरातील भाजपा नगरसेवक तथा बांधकाम सभापती विजय बडगुजर यांनी बोदवड येथील श्री संत सेना महाराज मंदिर बांधकामसाठी 11 हजार रुपये देणगी दिल्याबद्दल त्यांचा नुकताच नाभिक समाजातर्फे सत्कार करण्यात आला.
विजय बडगुजर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी नाभिक समाजबांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी संस्थेचे संस्थापक संतोषजी कुंवर,अध्यक्ष राजुभाऊ डापसे, सचिव विवेक वखरे, संस्थेचे माजी अध्यक्ष संजय वाघ व संचालक प्रकाश बाभुळकर, शंकर अंबुसकर हे नाभिक बांधव उपस्थित होते.