TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ज्येष्ठ महिला सभासद पुष्पाताई चौधरी यांनी केले जळगाव जिल्हा बँकेचे झेंडावंदन !

जिल्हा बँकेच्या 106 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा ज्येष्ठ महिला सभासदला झेंडावंदनाचा बहुमान !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 15, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या 106 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा ज्येष्ठ महिला सभासदला झेंडावंदनाचा बहुमान मिळाला. आज पुष्पाताई लीलाधर चौधरी (वय 80), झेंडावंदनाचा बहुमान मिळालेल्या महिला सभासदाचे नाव आहे.

एकेकाळी आशिया खंडात नावारूपाला असणारी दगडी बँक म्हणजेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. या बँकेमध्ये चेअरमन म्हणून जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातील राजकीय ज्येष्ठ नेत्यांनी चेअरमन पदाची धुरा सांभाळलेली आहे. विद्यमान चेअरमन संजय मुरलीधर पवार यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन झाल्यानंतर प्रथम झेंडावंदन त्यांच्या हातून होईल, असे अपेक्षित होते. कारण बँकेची पद्धत आहे की, 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या दोन्ही दिवशी झेंडावंदन करण्याचा मान हा जिल्हा बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच केव्हातरी संचालक यांनी केलेले आहे. परंतू जळगाव जिल्हा बँकेला 106 वर्ष पूर्ण होत आहे आणि अशावेळी विद्यमान चेअरमन संजय पवार यांनी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांना सूचना केल्या की, जळगाव जिल्हा बँकेचे यावेळीच झेंडावंदन जळगाव जिल्हा बँकेच्या ज्येष्ठ महिला सभासद यांच्या हस्ते करावे.

READ ALSO

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2026 !

जितेंद्र देशमुख यांनी लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन तशी निवड करण्यास सांगितले. त्यानुसार योगायोग जुळून आला की, जिल्हा बँकेचे एकेकाळी सांगवी तालुका यावल येथील त्र्यंबक श्यामजी चौधरी हे जिल्हा बँकेचे 45 वर्ष संचालक होते. त्यानंतर लीलाधर त्र्यंबक चौधरी हे जवळपास जिल्हा बँकेचे 30 ते 35 वर्षे संचालक होते. त्यानंतर प्रशांत लीलाधर चौधरी हे देखील जिल्हा बँकेचे दहा वर्षे संचालक होते. जवळपास एकाच कुटुंबात 80 ते 90 वर्ष संचालक होण्याचा मान हा जळगाव जिल्ह्यातील सांगवी येथील चौधरी कुटुंबाला मिळालेला आहे आणि हा योगायोग समजून त्यांच्याच परिवारातील महिला सभासद श्रीमती पुष्पाताई लीलाधर चौधरी यांना झेंडावंदन करण्याचा मान जिल्हा बँकेच्या वतीने देण्यात आला.

याबद्दल सभासदांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये कौतुक केले जात होते. जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार व कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्या हस्ते पुष्पाताई चौधरी यांना शाल श्रीफळ व साडी चोळी देऊन त्यांचा यथोचित मानसन्मान करण्यात आला. श्रीमती पुष्पाताई चौधरी यांनी देखील जळगाव जिल्हा बँकेने एक वेगळी प्रथा सुरू केल्याबद्दल मनस्वी समाधान व्यक्त केले. जळगाव जिल्हा बँकेच्या 106 वर्षाच्या इतिहासात ज्येष्ठ सभासदाने झेंडावंदन करण्याचा मान मिळाल्याचे ही प्रथम घटना असल्याचे बोलले जात आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2026 !

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2026 !

June 23, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
Next Post

मित्रांसोबत पोहायला गेला अन् घडलं अघटीत ; १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींनी नोंदणी करणे बंधनकारक

January 16, 2021

‘मनपा’च्या स्व.अटल बिहारी वाजपेयी उपवन उद्यानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

September 18, 2021

वाढदिवसाला गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 22, 2026

अनुभवमऺटप भारतातील पहिली लोकशाही संसद !

May 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group
 

Loading Comments...