TheClearNews.Com
Tuesday, July 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लाईनमन : विजेची लाईफलाईन

vijay waghmare by vijay waghmare
March 4, 2026
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासारखीच वीज ही आजच्या जीवनातील मूलभूत गरज बनली आहे. घरातील दिवा, पंखा, पाणीपुरवठा, मोबाईल चार्जिंग, रुग्णालये, उद्योगधंदे सगळे काही विजेवर अवलंबून आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला की जीवनाची गतीच थांबते. महाराष्ट्रातील कोट्यवधी नागरिकांच्या घराघरांत वीज पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम महावितरण अर्थात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित करत आहे. या विशाल यंत्रणेचा खरा कणा म्हणजे जनमित्र – आपले लाईनमन. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 4 मार्च हा दिवस ‘लाईनमन दिन’ म्हणून साजरा केला जातो.

अदृश्य पण अत्यावश्यक सेवा

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जुलै 2026 !

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

वीज ही दिसत नाही, पण तिचे अस्तित्व प्रत्येक क्षणी जाणवते. विजेची निर्मिती, पारेषण आणि वितरण या टप्प्यांतून ती ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचते. या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात आव्हानात्मक टप्पा म्हणजे वितरण. शहरातील उंच इमारतींपासून ते दुर्गम डोंगराळ भागातील लहानशा वाड्यांपर्यंत अखंड वीजपुरवठा राखण्यासाठी जनमित्रांना 24 तास तत्पर राहावे लागते.

आपल्या घराचा वीजपुरवठा काही मिनिटांसाठी खंडित झाला तरी अस्वस्थता वाढते; परंतु त्या मागे लाईनमनना कोणत्या परिस्थितीत काम करावे लागते, याची जाणीव अनेकांना नसते. रात्री-अपरात्री, मुसळधार पावसात, कडाक्याच्या उन्हात किंवा वादळाच्या झंझावातातही ते उंच खांबांवर चढून दुरुस्ती करतात. वीजयंत्रणेत एक क्षणाची चूकही जीवघेणी ठरू शकते कारण छोट्याशा चुकीलाही वीज कधीच माफ करत नाही.

संकटातही अविरत सेवा

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राने अनेक नैसर्गिक संकटांचा सामना केला. निसर्ग व तौक्ते या चक्रीवादळांनी किनारपट्टीलगतच्या व राज्यातील इतर ठिकाणच्या वीजयंत्रणेचे मोठे नुकसान केले. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. अशा वेळी जनमित्रांनी जीवाची पर्वा न करता तुटलेल्या वाहिन्या दुरुस्त केल्या, पडलेले खांब उभे केले आणि लाखो घरांत पुन्हा प्रकाश आणला.

तसेच कोरोनाच्या संकटात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना नागरिक घरात सुरक्षित राहू शकले कारण वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी लाईनमन सतत कर्तव्य बजावत होते. रुग्णालये, आयसोलेशन केंद्रे, लसीकरण केंद्रे या सर्व ठिकाणी अखंड वीजपुरवठा करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.

विश्वविक्रमात मोलाचा वाटा

महावितरणतर्फे महाराष्ट्रात एकाच महिन्यात सर्वाधिक 49,911 सौर कृषिपंप बसवण्याचा विक्रम करण्यात आला. या विक्रमाची जगातील सर्वात प्रतिष्ठित ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ म्हणून नोंद झाली. कमी काळात मोठ्या संख्येने पंप बसवण्याचा भीमपराक्रम करण्यात महावितरणच्या अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. महावितरणच्या लाईनमन मंडळींनी प्रचंड मेहनत घेऊन सौर कृषिपंपांचे प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्वेक्षण वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान पेलले आणि विश्वविक्रमास हातभार लावला. 5 डिसेंबर 2025 रोजी गिनीज विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यात बोलताना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनीही जनमित्रांच्या या कार्याची दखल घेतली. ‘लाईनमन ही महावितरणची लाईफलाईन आहे’, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

प्रकाश पेरणारी माणसं

महावितरणच्या ग्राहकसंख्येत दरवर्षी लाखोंची भर पडत आहे. वाढती वीजमागणी, नवीन उपकेंद्रे, हजारो किलोमीटरच्या वाहिन्या आणि वितरण रोहित्रे या सर्वांची देखभाल व दुरुस्ती करणे ही मोठी जबाबदारी आहे. यासोबतच नवीन जोडण्या देणे, थकीत बिलांची वसुली, वीजचोरीविरोधातील कारवाई अशा विविध ग्राहकसेवाही जनमित्र अर्थात लाईनमन पार पाडतात. त्यांच्या कामात शारीरिक कष्ट तर आहेतच, पण मानसिक तणावही कमी नाही. वेळेचे बंधन नाही आणि प्रतिकूल हवामानात काम सुरूच राहते. धोक्याची तर कायमच छाया. तरीही सुरक्षितपणे काम करत ग्राहकांच्या घरात प्रकाश राहिला पाहिजे या एकाच ध्येयाने ते कार्यरत असतात.

पडद्यामागचे नायक

आपण दिवा लावतो तेव्हा त्या प्रकाशामागे असलेल्या घामाची, परिश्रमाची आणि धैर्याची आठवण ठेवणे गरजेचे आहे. लाईनमन दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून, या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम करण्याचा दिवस आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यावर अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे; परंतु त्या मागे झटणाऱ्या जनमित्रांच्या प्रयत्नांची दखल घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांच्या समर्पणामुळेच आपले जीवन प्रकाशमान आहे. काळोखाशी झुंज देत आपल्या आयुष्यात उजेड आणणाऱ्या या माणसांना लाईनमन दिनानिमित्त कृतज्ञतापूर्वक मानवंदना.

– ज्ञानेश्वर आर्दड, जनसंपर्क अधिकारी, महावितरण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जुलै 2026 !

July 20, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 जुलै ते 25 जुलै 2026 !

July 19, 2026
धरणगाव

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

July 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जुलै 2026 !

July 18, 2026
धरणगाव

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

July 17, 2026
Next Post

प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाचा निघृण खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेख मोईनुद्दीन इकबाल अहमद यांची सपाच्या जिल्हा निरीक्षकपदी निवड

March 15, 2021

अमळनेर येथील चोरीचा संशयित आरोपी शिंदखेडा येथून ताब्यात !

August 1, 2021

भाविनाने इतिहास रचला, टेबल टेनिसमध्ये सिल्वर मेडल पटकावलं

August 29, 2021

मोहाडी कोव्हीड सेंटर भ्रष्टाचार प्रकरण : मनुष्यबळ सेवा पुरवठा करारनामाच बोगस?

September 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group