धानोरा ता. चोपडा (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या देवगाव येथे एक माकड झाडावरून पडल्याने मृत्यु पावले होते. त्या माकडावर देवगाव येथील ग्रामस्थांनी वाजंत्री लावुन, गावभर मिरवणूक काढून एका मंदिराजवळ अंत्यसंस्कार करण्यात आला. सदरील माकड हे गेल्या सहा महीन्यापासुन गावातच वास्तव करत होते.
याबाबत सविस्तर असे की, गेल्या सहा महीन्यांपासुन गावात दोन माकड वास्तवास होते. पूर्ण गावभर फिरत असतांना मुले त्यांना चांगलेच खाऊ-पिऊ घालत होते. यामुळे दोन्ही माकड हे जणु गावातील रहिवाशी झाले असावे. मुलांशी चांगलीच मैत्री झाली होती. पण दि. २७ रोजी या दोन माकडांपैकी एका माकडाचा झाडावरून तोल जाऊन पडल्याने मृत्युमुखी पडले. यामुळे दुसरे माकड रडत असल्याचे दृश्य पाहुन देवगाव करांचा पाझरांचा बांध फुटला. यावेळी सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन माकडावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. तेव्हा हिंदु रितीरिवाजानुसार माकडाची वाजंत्री लावुन पूर्ण गावभर मिरवणुक काढून एका मंदिराजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्या अंगी असलेली प्राण्याविषयी भुतदया दिसुन आली. तसेच माकडाचे तीन दिवस सुतक पाडणार असुन अन्नदानाचा कार्यक्रम करणार आहे.