जळगाव (प्रतिनिधी) येथे आज विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाची जिल्हास्तरीय बैठक केमिस्ट भवनात आयोजित करण्यात आली होती. सदरील बैठकीत विहिंपचे जिल्हाध्यक्ष श्रीराम बारी व बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष राकेश लोहार यांनी मार्गदर्शन करून नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्त केली.
त्यात धरणगाव तालुक्यातील विश्व हिंदू परिषदच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी श्रीपाद पांडे यांची तर तालुकाउपाध्यक्ष म्हणून हेमंत महाजन यांनी निवड जिल्हाध्यक्ष श्रीराम बारी यांनी केली. बजरंग दलच्या जिल्हाउपाध्यक्षपदी प्रथम सूर्यवंशी तर तालुकाध्यक्षपदी आकर्ष तिवारी यांची निवड जिल्हाध्यक्ष राकेश लोहार यांनी केली. तसेच नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देखील दिल्या.