चोपडा (प्रतिनिधी) येथील विवेकानंद विद्यालयातील इयत्ता 4 थी चा विदयार्थी चि.भुवनेश्वर जगदीश कंखरे याने CPS MATHS OLYMPIAD परिक्षेत नुकतेच उत्तुंग यश संपादन केले होते. यामुळे त्याची `विमानातील सहल´ प्रवासासाठी निवड झाली होती. त्यानुसार दि. 27 जुलै 2024 रोजी चि.भुवनेश्वर याने त्याच्या आई-बाबासह इंदोर ते दिल्ली असा विमानप्रवास केला आहे.
विमान प्रवास(इंदोर ते दिल्ली)-दिल्ली दर्शन -परतीचा प्रवास(रेल्वे AC)-Full Board चे आयोजन CPS MATH OLYMPIAD FOUNDATION तर्फे दिले जात आहे. चि.भुवनेश्वर यास विवेकानंद विद्यालयातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्याचा यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त, संस्थेचे विश्वस्त व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा चित्ते,ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी.जी.पाटील, इंग्लिश मिडियमच्या प्राचार्या सुरेखा मिस्त्री, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी भावे,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतरकर्मचारीवृंद, पालकवृंद,यांनी कौतुक केले.