भुसावळ (प्रतिनिधी) व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांच्या देश पातळीवरील संघटनेची भुसावळ तालुका कार्यकारणीची घोषणा करण्यात आली असून संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी उज्वला बागुल (सामना) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
व्हॉईस ऑफ मीडिया भुसावळ तालुका कार्यकारिणीत उपाध्यक्ष – श्याम गोविंदा (लोकमत), उपाध्यक्ष – संतोष शेलोडे (खान्देश लाईव्ह), सचिव – सुनील अराक, सहसचिव – कैलास उपाध्याय (साप्ताहिक भुसावळ दर्पण), सहसचिव – सुनील वानखेडे (दिव्य मराठी), संघटक – संजय काशिव (दै. आव्हान), कोषाध्यक्ष – दिपक चांदवाणी ( हिंदुस्थान बेस्ट समाचार), सदस्य – आशिष पाटील (देशदुत), संजय काशिव (दै. आव्हान), मंदार जोशी ( लोकशाही), खुशाल नागपुरे (बीसीएन आवाज), प्रेम परदेशी (देशोन्नती), हबीब चव्हाण (लोकमत), अॅड. जास्वंदी भंडारी (सातपुडा कन्या), सल्लागार – श्रीकांत जोशी (सकाळ), संजयसिंग चव्हाण (देशदुत) यांचा समावेश आहे.