चोपडा : प्रतिनिधी
येथील नगरपालिकेच्या वतीने चोपडा शहरात आझाद चौकात मतदानासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये आठवडी बाजारात मंडप टाकून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरित करणारे संदेश दिले गेले. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक सेल्फी पॉईंट्स या ठिकाणी उभारण्यात आले होते. अनेक मतदारांनी यावेळेस उत्सुकतेपोटी आपले फोटो काढून घेतले. आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने मी प्रयत्न केले गेले. मतदारांच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले.
मतदान जनजागृती व मतदार सुविधा कक्षाची स्थापना करून नागरिकांना मतदानाविषयी इत्यंभूत माहिती देण्यात आली .मतदान केंद्राचे तपशील, वोटर हेल्पलाइन ॲप, मतदानासाठी आवश्यक असलेले बारा ओळखीचे पुरावे तसेच मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली.
सदर मतदान जनजागृती पथकात पथक प्रमुख म्हणून निलेश ठाकूर क्षेत्रीय अधिकारी चोपडा शहर क्षेत्र क्रमांक 11 तसेच बीएलओ श्री सतीश सूर्यवंशी ,हर्षल वाघ असिफ अली, मोहम्मद शेख, बीटी साळुंखे ,मयूर बारेला यांनी सहभाग घेतला.
यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, उपमुख्य अधिकारी सुरसे आणि पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले