चोपडा (प्रतिनिधी) महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) येथे “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात दिनांक ३०/१२/२०२४ रोजी भव्य ग्रंथ व पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनात वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली होती, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली व दिनांक ०१/०१/२०२५ रोजी सामूहिक वाचनाचे सत्र आयोजित करण्यात आले होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री व्ही एन बोरसे यांनी विद्यार्थ्यांना वाचताना जिज्ञासा निर्माण करावी आणि त्या जिज्ञासेच्या आधारावर वाचन करावे. वाचनातून आलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात कसा उपयोग करता येईल याचा विचार करावा. आवाहन केले आणि या कार्यक्रमातून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळाले आणि विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व ओळखले. सदरील कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील व सचिव ताईसाहेब डॉ स्मिता संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.