जळगाव (प्रतिनिधी) परीक्षार्थींना टाटा कन्सल्टन्सीचे रिद्देश भारंबे यांनी परीक्षा हॉलमध्ये बसू दिले नाही व त्यांना वेळेच्या आत न आल्याने हाकलून दिलेले आहे. सदर परीक्षार्थींनी विनवण्या केल्या असता भारंबे यांनी कोणतीही दाद दिली नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
महाराष्ट्र राज्य वक्त मंडळाची अधिकारी पदाची परीक्षा ऑनलाइन घेण्याचा ठेका टाटा कन्सल्टन्सी या संस्थेला देण्यात आला असून टाटा ने या लेखी ऑनलाईन परीक्षा पाळधी येथील साई टेक्नो बाईट या संस्थेला दिले होते. परंतु परीक्षेचे ठिकाण मध्ये कुठेही पाळधी गावाचा उल्लेख न होता रिपोर्टिंग टाईम सकाळी साडेसात वाजेचा होता. परीक्षार्थी वेळेच्या आत ठिकाणावर पोहोचले सदर ठिकाण पाळधी गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर होते. परीक्षार्थींना ऐन वेळेस काही कागदपत्र झेरॉक्स मागणी करण्यात आली. काहींचे आयडी ओरिजनल मागितले, तर काहींचे प्रवेश पत्रिका या आडव्या कागदावर होत्या, त्या उभ्या कागदावर मागितल्या तर काही परीक्षार्थींचे कमरेचे बेल्ट काढायला बाहेर पाठवले. हे सर्व कार्य केल्यावर परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर आले तेव्हा या परीक्षार्थींना टाटा कन्सल्टन्सीचे रिद्देश भारंबे यांनी परीक्षा हॉलमध्ये बसू दिले नाही व त्यांना वेळेच्या आत न आल्याने हाकलून दिलेले आहे. सदर परीक्षार्थींनी विनवण्या केल्या असता भारंबे यांनी कोणतीही दाद दिली नाही.
जळगावचे सामाजिक कार्यकर्ते पाळधीमध्ये दाखल !
सदर बाब जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांना कळताच त्यांनी आपले सहकारी अन्वर खान, अनिस शाह, साहिल पठाण,अमजद खान, यांच्यासह तातडीने पाळधी येथे जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून परीक्षा घेण्याची विनंती केली असता त्यास त्यांनी दाद दिली नाही एवढेच नव्हे तर परीक्षार्थींची लेखी तक्रार सुद्धा टाटा कन्सल्टन्सी चे रिद्देष भारंबे यांनी स्वीकारली नाही.
शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची घेतली तातडीने भेट !
सदर शिष्टमंडळ व विद्यार्थी यांनी त्वरित जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालय गाठले असता जिल्हाधिकारी हे महत्त्वाच्या मीटिंगमध्ये व्यस्त असल्याने अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांना शिष्टमंडळाने भेटून सर्व हकीकत सांगितली व लेखी तक्रार सादर केली या तक्रारीची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाला सुद्धा दिली.
तक्रारीत नमूद महत्त्वाचे मुद्दे !
टाटा कन्सल्टन्सी चे कर्मचारी रीद्देश भारंबे यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, वक्फ मंडळाचे ऑबजरवर मोहम्मद सुलेमान यांची सुद्धा चौकशी करण्यात यावी, ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून अलिप्त ठेवले त्यांची फेरपरीक्षा घेण्यात यावी.
वंचित झालेले विद्यार्थी !
अश्फाक शेख,तौसिफ शेख, अल्ताफ शेख,तनवीर सैयद , जुबेरअहमद.