बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील जलचक्र बु।। येथील जि. प. शाळेत कार्यरत उपशिक्षिका गीता लढे यांना तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक व साहित्यिक कार्याची दखल घेत त्यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका विद्यारत्न पुरस्कार २०२३,वसूनंदिनी फाऊंडेशन जामनेर यांचा राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार २०२३,व राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२३,मागील दोन महिन्यात त्यांना हे पुरस्कार प्रदान केले आहेत.
शाळेत विविध उपक्रम व कार्यक्रमात सहभाग घेत सूत्रसंचालन स्वरचित स्वागत गीत गायन करत असतात. तसेच शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांना सोबत घेऊन प्रोत्साहित करतात. नोकरीतील आणि कौटुंबिक जवाबदारी सांभाळत कविता कथा, चारोळी,अलक लेखन याची आवड जोपासली आहे.१२ऑगस्ट २०२० ला पहिला कविता संग्रह ‘ गीतावली ‘ प्रकाशित झाला असून दुसरा कवितासंग्रह ‘ पुन्हा एकदा ‘ लवकरच प्रकाशित होणार आहे. सुश्राव्य आवाजाची नैसर्गिक देण असल्याने स्वरचित कविता रेकॉर्ड करून प्रसिध्द मार्गावर आहेत.क्रांती साहीत्य विचारमंच,रचीयता साहित्य मंच, कवी कट्टा, नक्षत्राचं देण काव्य मंच, स्टोरी मिरर सारख्या विविध माध्यमातून लेखन करत आहेत.
शाळेतर्फे विविध स्पर्धेत सहभाग घेत प्रथम,द्वितीय, तृतीय, आणि उत्तेजनार्थ क्रमांक मिळवत शाळेच्या नावलौकिकात भर टाकत असतात.गेल्या आठ वर्षांपासून जलचक्र शाळेत कार्यरत असलेल्या लढे या विद्यार्थीप्रिय आहेत. या वर्षी नियमानुसार बदली झाल्याने त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांना रडू कोसळले होते अखेर त्यांनाच त्या भावनिक झालेल्या विद्यार्थ्यांना समजून सांगावे लागले. तसेच पालक व गावातील लोकांना सुद्धा त्यांच्या बदलीचे दुःख झाले आहे.त्यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल गट शिक्षणाधिकारी बी. एन .लहासे, केंद्र प्रमुख गोपाळ पाटील, ग्रेडेड मुख्याध्यापक के. के .तागावले आणि शाळेचा शिक्षकवृंद तसेच स्नेही परिवार यांनी त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे. या वाटचालीत जीवनसाथी अरविंद मदारे यांचे प्रोत्साहन मिळत असल्याने आपल्याला आवड व छंद जोपासने शक्य झाल्याचे व्यक्त होत या यशाचे श्रेय त्या मंदारे यांना देतात.