मेष : व्यवसायात परिश्रम वाढवावे लागतील. नफ्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाचे कामकाज व्यस्त राहील. आर्थिक बाबतीत व्यवहार जपून करा. राजकीय क्षेत्रात तुमच्यावर सोपवलेली जबाबदारी वेळेत पार पाडावी लागेल. दिनांक २९, ३० हे संपूर्ण दोन दिवस आणि ३१ तारखेला दुपापर्यंत असा कालावधी मनाची घालमेल वाढवणारा असेल. या कालावधीत कोणतीही गोष्ट काही गडबडीने करायला जाऊ नका, तोटा होण्याची शक्यता आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. त्यामुळे त्रास होणार नाही. बाकी कालावधी चांगला असेल.
वृषभ : व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करणे शक्य होईल. नोकरदार वर्गाला केलेल्या कामाबद्दल वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. आर्थिक परिस्थितीत चांगले बदल घडतील. समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळेल. सध्या स्थिती बदलणारी आहे. जे जे काम हाती घ्याल ते पूर्णत्वाला जाईल. मनासारख्या गोष्टी घडू लागतील. इतरांच्या मदतीची अपेक्षा वाटणार नाही. वृषभ राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा हा आठवडा आर्थिक दृष्टीने खूप चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अधिक स्त्रोतांकडून पैसे मिळतील.
मिथुन : व्यवसायातून बरीच मोठी उलाढाल होऊ शकते. पण व्यवहारात्मक गोष्टी विसरून चालणार नाहीत. भागीदारी व्यवसायाला चालना मिळेल. नोकरदार वर्गाला कामाचा अनुभव चांगला असेल. आर्थिकदृष्टय़ा बचत करा. दिनांक २५, २६ या दोन दिवसांत पळापळ करून कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका. हे दोन दिवस आगामी काळासाठी नियोजन करण्यासाठी वेळ द्या. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. या कालावधीत महत्त्वाचे करार पार पडतील. मिथुन राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा हा आठवडा यशस्वी राहील. या आठवड्यात तुम्हाला कायदेशीर वाद आणि न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळेल.
कर्क : भागीदारी व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिशोब चोख ठेवा. व्यावसायिक वाढ झपाटय़ाने होईल. नोकरदार वर्गाला अचानक धनलाभ होईल. दिनांक २७, २८ रोजी स्पष्ट बोलण्याने इतरांची मने दुखावली जाऊ शकतात हे विसरू नका. तेव्हा हे दोन दिवस शांत राहिलेले सर्वात उत्तम राहील. तुमचे मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. ज्या गोष्टींपासून त्रास वाढणार आहे अशा गोष्टींचा ध्यास सोडून द्या. या आठवड्यात तुम्हाला पैसे कमावण्याच्या चांगल्या संधीही मिळतील. व्यापारी वर्गातील लोकांनाही नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
सिंह : रागाने कोणतीही गोष्ट करणे त्रासाचे राहील. त्यासाठी संयम ठेवा. व्यवसायात फायद्याचे प्रमाण कमी राहिले तरी चालेल. मात्र गुंतवणूक करून नुकसान करून घेऊ नका.नोकरदार वर्गाला आपले काम चोख करावे लागेल. आर्थिकदृष्टय़ा खर्च कमी करा. सध्या ग्रहमानाचा विचार करता या आठवडय़ात सर्वच बाबतीत पाऊल जपून टाकावे लागेल. एखाद्याला प्रामाणिकपणे कोणतीही गोष्ट सांगायला गेल्यास त्या उलट प्रतिक्रिया मिळतील. त्यामुळे सध्या कोणत्याच गोष्टीच्या भानगडीत न पडलेले चांगले. सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत थोडा त्रासदायक ठरू शकतो. वास्तविक, या आठवड्यात तुम्हाला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
कन्या : व्यावसायिक घडामोडीत स्वत:हून बदल करत बसू नका. जो नफा मिळणार आहे त्यातच समाधान माना. नोकरदार वर्गाने वरिष्ठांशी हुज्जत घालू नका. समाजसेवा करताना भान ठेवा. आर्थिकदृष्टय़ा खर्चाची बाजू सांभाळा. सद्यस्थितीत बोलणे असो, वागणे असो कोणत्याच गोष्टीवर नियंत्रण राहणार नाही. आपली प्रतिक्रिया इतरांसमोर व्यक्त करताना गरजेचे तेवढेच बोला. या आठवड्यात तुम्हाला सरकारी कामात पैसे मिळण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. या दरम्यान तुम्ही इतरांना जो काही सल्ला द्याल तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
तूळ : व्यावसायिक स्तरावर निर्माण झालेल्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रयत्न करा. हा प्रयत्न यशस्वी ठरेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांनी ठरवून दिलेल्या नियमावलीत स्वत: बदल करणे त्रासाचे राहील. खर्च करताना नियंत्रण ठेवा. दिनांक ३० रोजी संपूर्ण दिवस ३१ तारखेला दुपापर्यंत असा हा कालावधी जेमतेम राहील. या दिवसांत चांगल्या गोष्टींची सुरुवात करू नका. कोणालाही वचनबद्ध राहू नका. तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र जाणार आहे. सध्या तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची नितांत गरज आहे.
वृश्चिक : व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. उधारी वेळेत वसूल होईल.नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत ऊर्जितावस्था येईल. राजकीय क्षेत्रातील वाटचाल चांगली असेल. आर्थिकदृष्टय़ा लाभ होईल. मुलांच्या बाबतीत आगामी काळासाठी गुंतवणूक कराल. ३१ तारखेचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. नियोजन केलेल्या गोष्टींत यश मिळेल. या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांना सरकारी क्षेत्रात अनुकूल परिणाम मिळतील. एवढेच नाही तर या आठवड्यात तुम्हाला व्यवसायसंबंधी प्रवासाला जावे लागू शकते.
धनू : इतरांच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. सध्या वेळ व काळ दोन्हीही गोष्टी चांगल्या असतील. व्यवसायात विविध योजनांचा नफा होईल. अनेक मार्गातून आलेले प्रस्ताव स्वीकारा. नोकरदार वर्गाला यशाचे गणित चांगले जमेल. आर्थिक बाबतीत भरभराटीचे दिवस येतील. या सप्ताहात सर्व दिवसांचा कालावधी चांगला असेल. याच संधीचा फायदा घेऊन आपल्याला आगामी काळाचे नियोजन करता येईल. या आठवड्यात धनु राशीच्या व्यापारी वर्गाच्या लोकांना व्यवसायात यश मिळू शकणार नाही. या आठवड्यात तुम्ही उच्च दर्जाच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित कराल.
मकर : चांगल्या कामाचा श्री गणेशा होईल.व्यवसायात खरेदी-विक्री व्यवहारातून यश मिळेल. मोठय़ा उद्योग व्यापाऱ्याला चालना मिळेल. रोखीचे व्यवहार वाढतील. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत दुहेरी लाभ मिळेल. आर्थिक बाबतीत खर्च कमी होईल. शेजाऱ्यांसोबत एखाद्या कार्यक्रमाविषयी चर्चा होईल. कोणावर अवलंबून राहून काम करण्याची वेळ येणार नाही. जे उद्दिष्ट तुम्हाला गाठायचे आहे ते सहजवारी गाठाल. मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्याबाबत चिंताजनक असू शकतो.
कुंभ : व्यावसायिक गुंतागुंत कमी होईल. भागीदारी व्यवसायात नवीन करारानुसार वाटचाल सुरू होईल. नोकरदार वर्गाने नियमबा गोष्टींना थारा देऊ नका. आर्थिकदृष्टय़ा खर्च सांभाळा. खर्च सांभाळादिनांक २५, २६ रोजी ज्या गोष्टी आपण स्वत: डोळय़ांनी पाहिलेल्या नाहीत, ज्याच्याविषयी खात्री नाही, अशा गोष्टींच्या संदर्भात चर्चा करणे टाळा. कोणाच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका. स्वत:हून एखाद्या वादविवादात पडू नका. हे दोन दिवस काळजीपूर्वक हाताळा. बाकी दिवस चांगले असतील. या आठवड्यात तुम्हाला एखाद्याकडून पैसे घ्यावे लागण्याची शक्यता आहे, म्हणून कर्ज घेण्याचा विचार करा.
मीन : व्यावसायिकदृष्टय़ा धावपळीचा कालावधी राहील. मात्र ही धावपळ व्यवसायवाढीसाठी चांगली असेल. याचा फायदाही निश्चित वाढेल. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत सुवर्णमध्य साधता येईल. आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. दिनांक २७, २८ हे दोन दिवस भावनिक गोष्टीत अडकू नका. राग राग करून कोणतेही निर्णय घेणे टाळा. आपल्या गोष्टी इतरांना पटवून देण्यासाठी नको तो त्रास वाढवून घेऊ नका. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घ्याल, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
















