मेष : व्यवसायात प्रतिस्पध्र्यावर मात कराल. नवीन व्यवसायाची सुरुवात करावयाची असल्यास हरकत नाही. नोकरदार वर्गाला कामासाठी फार दगदग करावी लागणार नाही. आर्थिक परिस्थिती उत्तम असेल. दिनांक ५ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. काही दिवस असे असतात की, हे करू नका ते करू नका. पण सध्या हा आठवडा चांगला असल्यामुळे चिंता राहणार नाही.
वृषभ : व्यवसायातून जो नफा झालेला आहे, त्या नफ्याचे त्वरित गुंतवणुकीत रूपांतर करा.नोकरदार वर्गाला बऱ्याच दिवसांतून दिवस चांगले आले आहेत असे वाटू लागेल. आर्थिकदृष्टय़ा आवकजावक वाढेल. दिनांक ३०, ३१ हे दोन दिवस घाईगडबडीने कोणती गोष्ट करायला जाऊ नका. त्यामध्ये फायदा कमी व नुकसान जास्त असे होऊ शकते. कोणतेही काम सावधानतेने केले पाहिजे. या दोन दिवसांत कारण नसताना कोणाशी मतभेद वाढणार नाही याची काळजी घ्या. स्पष्टपणे बोलायला गेलात तर त्या नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल.
मिथुन : व्यवसायात धरसोड वृत्ती टाळा. नोकरदार वर्गाला कामाचा ताण कमी होईल. आर्थिक बाबतीत गुंतवणूक विचारपूर्वक करा. दिनांक १ व २ हे दिवस शांत राहून काम करायचे ठरवले तरी तसे होणार नाही. परिस्थिती अशी निर्माण होईल की तिथे बोलणे गरजेचे राहील. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, बोलताना नीट विचार करा. मुद्देसूद बोलण्यावरच भर द्या. ज्या गोष्टी व्यवहारात बसत नाहीत अशा गोष्टींचा उल्लेख करूच नका; अन्यथा नुकसान होऊ शकते. स्वत:मध्ये बदल करून पुढे चला, त्यामुळे त्रास होणार नाही.
कर्क : मनासारख्या गोष्टी सध्या घडणार नाहीत आणि त्या घडाव्या म्हणून विनाकारण आपली ऊर्जा वाया घालवू नका. एखाद्याला चांगला सल्ला द्यायला गेला तर तो सल्ला तुम्हालाच त्रासदायक ठरेल. समोरच्याला तो सल्ला पटेलच असे नाही. तेव्हा आपले काम भले नि आपण भले हेच सूत्र लक्षात ठेवा. व्यावसायिक गुंतवणूक टाळा. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालू नका. समाजमाध्यमांपासून लांब राहा. कुटुंबामध्ये कोणाची मध्यस्थी करायला जाऊ नका.
सिंह : स्वत:चे काम स्वत: करा. कोणावर अवलंबून राहू नका. व्यवसायातून जे उत्पन्न मिळणार आहे त्याचा योग्य ठिकाणी वापर करा. नोकरदार वर्गाने वरिष्ठांशी स्पष्ट बोलणे टाळावे. आर्थिक व्यवहार मार्गी लागण्यासाठी बचत करा. दिनांक १, २, ५ हे तीन दिवस फारसे अनुकूल नाहीत. त्यामुळे या दिवसांत कोणाशीही संवाद करताना जपूनच करा. आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या गोष्टींवर चर्चाच करू नका; नाहीतर तुमचा कुठलाही संबंध नसताना त्रास होऊ शकतो. हे तीन दिवस विचाराने कृती करा.
कन्या : ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नका. त्याचा त्रास तुम्हाला स्वत:लाच होणार. व्यवसायात चढाओढ असली तरी अपेक्षित फायदा मात्र होणारच आहे. नोकरदार वर्गाने ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. आर्थिक व्यवहार जपून करावेत. दिनांक ३, ४ हे दोन दिवस सर्व काही चांगले असताना अस्वस्थता जाणवू लागेल. ही अस्वस्थता होऊन गेलेल्या गोष्टींचा विचार केल्यामुळे होऊ शकते. त्यामुळे अति विचार करणे टाळा. एखादी गोष्ट मनाला पटली नाही तर ती सोडून द्या. त्यासाठी वादविवाद वाढवू नका.
तूळ : चांगल्या कालावधीत संघर्ष करावा लागत नाही. कामे अगदी चुटकीसरशी होतात. व्यवसायात चाललेल्या घडामोडींमध्ये नवीन बदल शक्य होतील. नोकरदार वर्गाच्या कामातील तांत्रिक अडचणी कमी होतील. सार्वजनिक ठिकाणी सामूहिक गोष्टींची आवड राहील. दिनांक ५ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम जाईल. जो कालावधी उत्तम असतो, चांगला असतो त्या वेळी आळस करून चालणार नाही. आळस बाजूला सारून काम करायचे ठरवले तर कामे निश्चित पूर्ण होतील. हे मात्र लक्षात ठेवा. चांगले दिवस वाया न घालवता कामाला लागा.
वृश्चिक : सध्या व्यवसायात मोठय़ा उलाढाली करू नका. नोकरदार वर्गाला काम करताना संघर्ष जाणवेल; मात्र हा थोडय़ा दिवसांसाठी असेल. आर्थिक बचत कराल. संततीच्या बाबतीत गोड बातमी कळेल. घरामध्ये ज्येष्ठ व्यक्तींच्या वागण्याबोलण्याचा त्रास जरी वाटला तरी त्यांचा अनादर करू नका. प्रत्येक आठवडय़ामध्ये एक तरी दिवस काळजी घ्यावी लागते असे दिवस असतात. सध्या एकही दिवस काळजी वाढवणारा नाही. अडलेली कामे मार्गी लागतील. एखाद्या व्यक्तीविषयी मनामध्ये असलेला राग स्पष्टपणे बोलून दाखवायचा हे जे तुम्ही ठरवले होते ते सध्या होणार नाही.
धनू : सप्ताहातील सर्व दिवस चांगले असतील. सध्या जे काम करायचे ठरवले आहे ते वेळेआधी पूर्ण होईल. त्यासाठी इतरांचे सहकार्यही मिळेल. तुम्ही स्वत:च इतके तत्पर असाल की, चांगल्या कालावधीचा फायदा कसा घ्यायचा असतो हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. त्यामुळे अगदी ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडू लागतील. व्यावसायिकदृष्टय़ा पळापळ झाली तरी फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला कामे वेळेत पूर्ण केल्यामुळे ज्येष्ठांकडून शाब्बासकी मिळेल. आर्थिक बाबतीत चिंता मिटेल. शेजाऱ्यांशी जेवढय़ास तेवढे राहा.
मकर : आपली मर्यादा ओलांडू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. पौर्णिमा तुमच्या राशीतूनच होत आहे. या दिवशी अस्वस्थता जाणवू लागली तरी दिवस चांगला जाईल. प्रत्येक व्यवसायात चढ-उतार असतोच, तेव्हा हे दिवस कायमस्वरूपी नाहीत हे लक्षात ठेवा. नोकरदार वर्गाला दुसऱ्यावर अवलंबून राहून काम करणे त्रासाचे राहील. नातेवाईकांशी सलोखा वाढेल. कुटुंबात मात्र वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. दिनांक ३०, ३१ हे दोन दिवस शांत राहण्याचा प्रयत्न करा. काय बोलावे आणि काय बोलू नये याचे भान या दोन दिवसांत राहणार नाही. कोणी कसे वागावे यासाठी तुम्ही उपदेश करू नका.
कुंभ : कायद्यातील नियमांचे पालन करा. हे दोन दिवस शांततेने घेतल्यास काही बिघडणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल. पौर्णिमा व्ययस्थानातून होत आहे. या दिवशी सहनशीलता ठेवा. व्यावसायिक यश मिळेल. नोकरदार वर्गाला कामासाठी जास्त वेळ द्यावा लागेल. आर्थिक उधारी टाळा. दिनांक १, २ असे हे दोन दिवस कोणताही व्यवहार करताना घाई-गडबड करू नका. थोडा विलंब झाला तरी चालेल. या दोन दिवसांत महत्त्वाचे काम पुढे ढकला. समोरून काही चांगले प्रस्ताव या दिवसांत आले तरी ते स्वीकारू नका. ते नुकसानीचे असू शकतात.
मीन : व्यवसायातून जो मोबदला मिळणार आहे तो गुंतवणूक म्हणूनच विचार करा. नोकरदार वर्गाला नवीन कामाचे प्रस्ताव येतील ते स्वीकारा. खर्च कमी करा. दिनांक ३, ४ या दोन दिवसांत माझेच खरे, मीच बरोबर असे करायला जाल तर नक्कीच फसाल. तेव्हा समोरच्याचे ऐकून घेण्याचीही मानसिकता ठेवा. भले त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. प्रत्येक काम वेळेत व्हावे असे जरी वाटत असले तरी सध्या या दोन दिवसांत त्या कामांना उशीर होणार आहे. शिवाय चढ-उतारही राहणार आहे.