TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य ३१ मार्च ते ६ एप्रिल २०२४ !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 31, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष :- तुमच्या मनाविरुद्ध घटनेला तुम्हाला सामोरे जावे लागेल. मंगळ-शुक्र युतियोगाची पार्श्‍वभूमी अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनांतून लाभ देणारी. तरुणांना बलवत्तर विवाहयोग. मानसिक चिंता राहील. वादविवादात सहभाग टाळावा. नोकरीच्या संधींवर लक्ष ठेवा. सप्ताहाची सुरुवात वैवाहिक जीवनातून सुवार्तांची. शुक्रवार भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सुंदर गाठीभेटींचा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी जुगार टाळावा. दैनंदिन कामात अडचणी येणार आहेत. आत्मविश्वासाचा अभाव राहील.

वृषभ :- हा आठवडा व्यावसायिक प्राप्तीत वाढ करेल. आत्मविश्वास वाढणार आहे. परिचयोत्तर विवाहयोग. आजचा रविवार छान करमणुकीचा. प्रवास सुखकर होतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट वैयक्तिक समारंभातून झगमगाटी ठरेल. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखीतून नोकरीचे योग. मित्रांकडून लाभ. अनेकांचे सहकार्य लाभेल. भागीदारी व्यवहारात सुयश लाभणार आहे. प्रभाव वाढेल.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन :- सप्ताह अतिशय गतिमानच राहील, भाग्यातील गुरूची साथ राहीलच. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील तर काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. आजचा रविवार गाठीभेटींतून महत्त्वाचाच. आर्थिक कामे आज नकोत. प्रवासात व वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट सुवार्तांतून फ्लॅशन्यूजमध्ये आणणारा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून आनंद. दानधर्म कराल.

कर्क :- आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. मंगळ-शुक्र युतियोगाची पार्श्‍वभूमी पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक उत्सव, प्रदर्शनं यशस्वी करणारी.जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. घरात विशिष्ट हृद्य समारंभ होतील. येता गुरुवार मोठ्या सुवार्तांचा. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळवार खरेदीत फसवणुकीचा. शनिवारी पुत्रचिंता घालवेल. अनेकांशी सुसंवाद साधाल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. लाभ होतील.

सिंह :- सप्ताह अतिशय गतिमान राहील. मात्र, करारमदार करताना कायदेशीर बाजू जपा. तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. बाकी मघा नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात मोठे व्यावसायिक लाभ उठवतील. चिकाटीने कार्यरत राहाल. प्रवासाचे योग सफल होतील. काहींना नव्या ओळखीतून लाभ. पूर्वा नक्षत्राच्या तरुणांना सप्ताहाचा शेवट कला, छंद वा इतर बौद्धिक उपक्रमांतून प्रकाशात आणणारा. आनंददायी घटना घडेल. उत्साह व उमेद वाढणार आहे.

कन्या :- सप्ताहातील सुवार्तांतून चर्चेत राहणारी रास राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. उत्सव-समारंभातून छान मिरवाल. उत्तरा व्यक्ती वैभवसंपन्न होतील. सोमवार, मंगळवार हे दिवस चढत्या क्रमाने शुभ. प्रसिद्धीचे योग येतील. भावंडांबरोबर सुसंवाद राहील. हस्त नक्षत्राच्या व्यक्ती नोकरीत भाव खाऊन जातील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी थट्टामस्करी टाळावी. मंगळवार बेरंगाचा होऊ शकतो. अपेक्षित गाठीभेटी पडतील. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो.

तूळ :- मंगळ-शुक्र युतियोगाच्या पार्श्‍वभूमीवर काही उत्तम लाभ होतील. विशिष्ट मार्केटिंग यशस्वी होईल. दैनंदिन आर्थिक कामे यशस्वी होणार आहेत. रेंगाळलेले खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती इतरांवर छाप पाडतील. व्यवसायातील उधारी, उसनवारी वसूल होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींचे परिचयोत्तर विवाह. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट सरकारी कामांतून यश देणारा. कामाचा ताण कमी असणार आहे. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. उच्चपदस्थ व्यक्तींकडून सहकार्य.

वृश्‍चिक :- मंगळ-शुक्र युतियोगाच्या पार्श्‍वभूमीचा हक्काने लाभ घेणारी रास. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे धनलाभ अपेक्षित आहेत. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना नव्या ओळखींतून लाभ होतील. महत्त्वाची कामे होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. वास्तूविषयक व्यवहार मार्गी लागतीलबुधवार आणि गुरुवार हे दिवस जाहिरात माध्यमातून यश देतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार थोरामोठ्यांच्या गाठीभेटींतून लाभाचा. तरुणांचा परदेशी भाग्योदय. अनेक बाबतीत समाधान लाभेल.

धनू :- अतिशय ऊर्जासंपन्न असा सप्ताह राहील. ताण व दगदग राहील. कामामध्ये लक्ष लागणार नाही. तरुण-तरुणींना हा सप्ताह कला, छंद वा इतर बौद्धिक उपक्रमांतून छानच. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना नव्या व्यावसायिक उपक्रमांतून उत्तम प्राप्ती होईल. मानसिक संभ्रमावस्थता राहण्याची शक्यता आहे. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींस मंगळावर हा दिवस मोठ्या उलाढालींचा. बलवत्तर विवाहयोग. महत्त्वाचे निर्णय आज नकोत. वादविवादात सहभाग टाळावा. चिकाटी वाढेल. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. प्रवासाचे योग येणार आहेत.

मकर :- राशीतील मंगळ-शुक्र युतियोगाचं अतिशय गुलाबी वातावरण राहील. आर्थिक लाभ होणार आहेत. सप्ताहात तरुण-तरुणींचं होले होले होईल. चिकाटी वाढेल. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. आजचा रविवार एकूणच सप्ताहाचं पॅकेज घोषित करेल; और क्‍या! उत्तराषाढा व्यक्ती प्रकाशात येतील. श्रवण नक्षत्रास येता गुरुवार संकटविमोचनाचा, शनिवार पुत्रोत्कर्षाचा. उंची वस्तूंची खरेदी कराल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे.

कुंभ :- सप्ताह घरगुती सुवार्तांतून मोठ्या मौजमजेचा. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती नोकरीतील घटनांतून खूष राहतील. आरोग्य उत्तम राहणार आहे. पती वा पत्नीचा आर्थिक उत्कर्ष होईल. सप्ताहात पर्यटनाचे योग. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना काही दिवस मोठ्या आनंदाचे. आपले तेच खरे कराल. अधिकार लाभेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचे परिचयोत्तर विवाह. प्रवासास दिवस अनुकूल आहे. तुमचे मन आनंदी व आशावादी राहणार आहे.

मीन :- सप्ताह निश्‍चितपणे तरुण-तरुणींमध्ये जान आणणारा. चिकाटी वाढेल. मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहणार आहात. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. सतत उत्सव-समारंभातून मिरवाल. उत्तराभाद्रपदा व्यक्तींचा व्यावसायिक शुभारंभ दणक्‍यात होईल. काही दिवस अनेक प्रकारांतून झगमगाट करवतील. नोकरीच्या मुलाखतींतून छाप पाडाल. कलाकारांचे भाग्योदय. रेवती नक्षत्रास परदेशी व्यापारात लाभ. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. कामाचा ताण कमी होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतुससह संशयित अटकेत ; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१५ ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना ई- पिक पाहणीची नोंद करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन !

August 2, 2024

४६ वर्षीय प्रौढाची आत्महत्या ; व्हॉट्सऍप चॅटमधून बाहेर पडले धक्कादायक सत्य !

January 28, 2025

ग्रामविकासासाठी सरपंचाचे सर्वांगीण विचार करावा : अनिकेत पाटील

September 20, 2022

जळगाव कारागृहातील सुभेदारासह तिघे धुळे एसीबीच्या जाळ्यात !

November 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group