मेष : घाईगडबड करून घेतलेले निर्णय नुकसानीचे ठरू शकतात, त्यामुळे निर्णय घेताना विचार करा. आज काही जणांना प्रियजन भेटल्याने विशेष आनंद होणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. वादविवादांपासून लांब राहून स्वत:ला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. तुमचे अंदाज अचूक ठरतील. नम्रता, संयम ठेवा. नवीन परिचय उत्साह वाढवणारा. नोकरीत परीक्षेसारखा कालावधी. धंद्यात उतावळेपणा नको.
वृषभ : व्यवसायातून उत्पन्न चांगले मिळेल. नोकरदार वर्गाला कामासाठी जास्ती वेळ द्यावा लागेल. दैनंदिन कामांत सुयश लाभणार आहे. आज तुमचा उत्साह व उमेद विशेष असणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. आर्थिक बाबतीत हिशेब चोख ठेवा. समाजसेवा करण्याचे पुण्य पदरी पडेल. विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. आरोग्य उत्तम राहणार आहे. प्रवास सुखकर होतील. कर्जाचे काम होईल. थोरा-मोठ्यांचे सहकार्य मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचे कौतुक होईल. योजनांना पुढे न्या.
मिथुन : नोकरदार वर्गाला कामामध्ये असणारा ताणतणाव कमी होईल. आर्थिक सफलता मिळेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अनुकूल संधी प्राप्त होणार आहे. मित्र-मैत्रिणींचे सहकार्य मिळेल. त्यांच्यासाठी वेळ काढून मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित कराल. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. स्वास्थ्य लाभेल. नोकरी टिकवा. वाद, तणाव टाळा. नविन परिचय नुकसानकारक. धंद्यात सावध रहा.
कर्क : व्यावसायिकदृष्ट्या यश खुणावेल अशी परिस्थिती निर्माण होईल. नोकरदार वर्गाला कामानिमित्त प्रवास करावा लागेल. दैनंदिन कामात काही अडचणी जाणवणार आहेत. मनोबल कमी राहील. नातेवाईकांशी जेवढ्यास तेवढे राहा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. काहींच्या मनावर कसलेतरी भावनिक दडपण राहील. प्रवास शक्यतो आज नकोत. वादविवादात सहभाग टाळावा. धंद्यात नवीन भागीदार शोधता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढेल. तुमचे मुद्दे अभ्यासपूर्ण असतील.
सिंह : व्यवसायातून अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात उत्पन्न मिळेल. नोकरदार वर्गाचे काम वेळेत पूर्ण होईल. सौख्य व समाधान लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमच्या आरोग्यविषयक तक्रारी कमी होणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी सहभाग राहील. कौटुंबिक वादविवाद टाळा. धार्मिक गोष्टींत मन रमेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. नोकरीत सावध रहा. धंद्यात फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात क्षुल्लक तणाव जाणवेल.
कन्या : व्यवसायात नवीन गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. काहींचा आज धार्मिक कार्यात सहभाग राहील. तर काहीजण मनोरंजन व करमणुकीकडे रमणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी इतरांना सल्ला न दिलेलाच चांगला. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. वाहने जपून चालवावीत. धंद्यात वाढ होईल. कर्जाचे काम होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कुणालाही कमी लेखू नका.
तुळ : अनोळख्या व्यक्तीशी दोन हात लांब राहा. आर्थिक बाबतीत व्यवहार जपून करा. कुटुंबातील मतभेद वेळीच दूर करा. आरोग्य उत्तम राहील. आज तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. एखादी गोष्ट करायला घेतली तर ती वेळेत न होणे यामुळे तुमची चिडचिड वाढेल. काहींना विविध लाभ होणार आहेत. प्रवासातून फायदा मिळेल. नवा परिचय, चर्चा यामुळे उत्साह, आत्मविश्वास वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांकडून आश्वासन मिळेल.
वृश्चिक : व्यवसायात वातावरण अनुकूल असेल. नोकरदार वर्गाचे काम सुरेख चालेल. आर्थिक ताणतणाव घेऊ नका. आज तुमचे मन अत्यंत आनंदी व उत्साही राहणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य सुधारणार आहे. समोरच्याचे थोडे ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा, म्हणजे वाद होणार नाही. कोणतेही काम करताना नियोजनाला महत्त्व द्या. नोकरी व व्यवसायात उत्तम स्थिती राहील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. नोकरीत चांगला बदल होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. धंद्यात वाढ होईल.
धनु : व्यवसायात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर मात करू शकाल. नोकरदार वर्गाला कामात येणारे अडथळे दूर होतील. आज तुम्ही अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावणार आहात. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. उधारीचे व्यवहार टाळा. घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पाहा. आपले मनोबल उत्तम राहणार आहे. जिद्द वाढेल. प्रवासात सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत तणाव राहील. धंद्यात कायद्याला धरून कामे करा.
मकर : व्यवसायातील उत्पन्न अपेक्षित असेल तेवढे मिळेल. नोकरदार वर्गाला कामाचा अंदाज येईल. आर्थिक गोष्टींचा ताळमेळ घालता येईल. कौटुंबिक जीवनात आज एखादी आनंददायी घटना घडणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. नेहमीपेक्षा जास्तीचे प्रयत्न करा. सर्व दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांत मालकी हक्क मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आज काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. धंद्यात अनेक मोठय़ा व्यक्ती पाठीशी उभ्या राहतील. नवे काम मिळेल. वसुली करा.
कुंभ : नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. आर्थिक समाधान मिळेल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा होईल. आज आपले मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होणार आहेत. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. गेले काही दिवस रखडलेली कामे तुम्ही आज मार्गी लावू शकणार आहात. आनंदी राहणार आहात. धंद्यात फसू नका. नोकरीत प्रभाव राहील. परिचय वाढतील. सावध रहा. गैरफायदा घेतला जाईल.
मीन : समाजमाध्यमांचा वापर कराल. घरगुती वातावरण ठीक राहील. पाहुणे मंडळींची ऊठबस कराल. आज आपले मन धार्मिक गोष्टींमध्ये रमेल. काहींची अध्यात्मिक प्रगती होईल. काहींचा मात्र आराम करण्याकडे कल राहील. जोडीदाराची साथ मिळेल.विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. आध्यात्मिक गोष्टींची आवड राहील. दैनंदिन कामात आपले लक्ष लागणार नाही. प्रवासात काळजी हवी. नोकरीत बढती होईल. कामाचे कौतुक होईल. धंद्यात नवे धोरण फायदा वाढवणारे ठरेल.