मेष : व्यवसायात जी स्थिती आहे ती चांगलीच आहे. त्यात स्वत:हून काही बदल करू नका. नोकरदार वर्गाला कामामध्ये होणारा ताणतणाव कमी होईल. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील.सामूहिक गोष्टीत सहभाग टाळा. दिनांक ६ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवस उत्तम असतील. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आपली सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. एखादा आर्थिक लाभ संभवतो. कुटुंबियांसह आनंदात वेळ जाईल.
वृषभ : नियमबाह्य गोष्टी टाळा. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. व्यावसायिकदृष्टय़ा जितका फायदा असेल तितके परिश्रमही वाढणार आहेत. इतरांची देणी वेळेत भागवाल. आर्थिक बाबतीत व्यवहार चोख ठेवा. दिनांक ७, ८ हे दोन दिवस कोणतेही महत्त्वाचे करार करू नका. आपल्यासाठी कोणी काही करावे, ही अपेक्षा सोडून द्या. जे काही करायचे आहे ते तुम्ही स्वत: करा, इतरांकडून अपेक्षा ठेवू नका. आपले मन वेगवेगळ्या चिंतांनी ग्रस्त असेल. स्वास्थ्य बिघडेल किंवा डोळ्याचे विकार संभवतात. कुटुंबीय किंवा आप्तजन यांचा विरोध राहील. आज सुरू केलेली सर्व कामे अपूर्ण राहतील.
मिथुन : अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल. प्राप्तीत वाढ होईल. मित्रांच्या भेटीतून आनंद मिळेल व फायदा सुद्धा होईल. संतती कडून लाभ होऊ शकतो. उत्तम भोजन मिळेल. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठय़ा प्रमाणात करू नका. नोकरदार वर्गाला कामामध्ये जी जबाबदारी दिलेली आहे ती व्यवस्थित पार पाडली जाईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. दिनांक ९, १०, ११ या तीन दिवसांत नियोजनाला महत्त्व द्या. कोणतेही नियोजन न करता काम करायला गेलात तर नेमके ते काम फसणार आहे. शिवाय दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका.
कर्क : एखाद्या छोटया प्रवासामुळे प्रसन्नता वाढेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. मन प्रसन्न राहील. मित्र व कुटुंबीय ह्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल.व्यापार – व्यवसायात फायदा होईल. व्यवसायासाठी केलेले श्रम सार्थकी लागतील. उद्योगधंद्यांना चालना मिळेल. नोकरदार वर्गाचे कामाचे स्वरूप बदलेल. आर्थिक मोबदला चांगला मिळेल.राजकीय महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागेल. या सप्ताहात शुभ पडघम वाजेल. सर्वच दिवस चांगले आहेत. चांगल्या गोष्टींचा शुभारंभ होईल. सध्या फार प्रयत्न करण्याची गरज भासणार नाही.
सिंह : आजारपणामुळे दवाखान्याचा खर्च वाढेल. राग व बोलणे ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. बाहेरच्या खाण्या – पिण्यामुळे प्रकृती बिघडेल. समोरून आलेले प्रस्ताव चांगले असतील. त्यासाठी विचार करत बसू नका. जे काही निर्णय घेणार आहात ते यशस्वी होतील. व्यावसायिक प्रगती उत्तम राहील. नोकरदार वर्गाला कामकाजात बढती मिळेल. आर्थिक बाबतीत समाधानाची परिस्थिती असेल. सध्या सप्ताहात चांगल्या संधीची वेळ आलेली आहे, तेव्हा तुम्ही कुठेही कमी पडू नका. अशा संधीचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करा.
कन्या : व्यावसायिक समीकरण चांगले जुळून येईल. नोकरदार वर्गाने तोडजोड स्वीकारणे हिताचे राहील. अनावश्यक खर्च टाळा. समाजसेवा करण्याची इच्छा निर्माण होईल. आरोग्याच्या बाबतीत दुखणे अंगावर काढू नका. दिनांक ७, ८ या दोन दिवसांत तुम्ही आजपर्यंत संयम ठेवा. अन्यथा त्याचा त्रास समोरचा माणूस व तुम्हालाही होणार आहे. हे दोन दिवस शांत राहा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे खाणे – पिणे टाळावे लागेल. आज आपला स्वभाव चिडचिडा झाल्याने बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. खूप खर्च होईल.
तूळ : संततीची समस्या काळजीत टाकील. मानहानीची शक्यता आहे. शेअर – सट्टा यात न पडणे हिताचे राहील. शक्यतो प्रवासात जपून राहा. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. घाई करून कोणताही निर्णय घेऊ नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. या दिवसांत समयसूचकता बाळगा. व्यवसायात उधारीचे व्यवहार करू नका. नोकरदार वर्गाने कामात लक्ष घालावे. आर्थिक बाबतीत गुंतवणूक योग्य ठिकाणी करा. सध्या माझेच खरे करून चालणार नाही. कोणावर आपले मत लादून चालणार नाही. कोणाला सल्ला द्यायला जाऊ नका. उलट दोन शब्द तुम्हालाच ऐकावे लागतील. त्यापेक्षा ‘तुमचे काम भले नि तुम्ही भले’ हेच योग्य राहील.
वृश्चिक : संततीची समस्या काळजीत टाकील. मानहानीची शक्यता आहे. शेअर – सट्टा यात न पडणे हिताचे राहील. शक्यतो प्रवासात जपून राहा. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. वातावरण शांत असताना गढूळ पाण्यात काठी मारू नका. इतरांच्यात हस्तक्षेप करणे टाळा. त्यामुळे त्रास होणार नाही. व्यवसायातील परिश्रम वाढवावे लागतील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे बोलणे खावे लागेल. आर्थिक व्यवहार जपून करा. समोरच्याने आपले ऐकलेच पाहिजे हे ब्रीदवाक्य खोडून टाका. सध्या ती परिस्थिती नाही. कोणताही साम-दंड-भेद वापरून जरी तुम्ही प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही.
धनू : मनावर चिंतेचे ओझे राहील. कौटुंबिक वातावरण कलुषित राहील. आईशी मतभेद होईल किंवा तिच्या प्रकृती संबंधी चिंता राहील. सार्वजनिक दृष्टया आपला मानभंग होऊ नये याकडे लक्ष द्या. व्यापारी वर्गाला नवीन गुंतवणुकीचा फटका बसू शकतो, त्यामुळे गुंतवणूक कमी करा. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील. अनावश्यक खर्च टाळा. दिनांक ९, १०, ११ हे तीन दिवस तारेवरची कसरत होणार आहे. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न करू नका. कारण नसताना जुन्या गोष्टींवरून वादविवाद वाढवू नका. चिडचिड कमी करा. दुसऱ्यावर अवलंबून राहणे त्रासाचे राहील. मागील अनुभव विसरू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल.
मकर : कौटुंबिक जीवनातील अडचणी दूर होत असल्याचा प्रत्यय येईल. संपत्ती विषयक कामांचा निर्णय होईल. व्यापार – व्यवसायात आर्थिक लाभ होईल. मनासारख्या गोष्टी घडाव्यात म्हणून तुमचा प्रयत्न मात्र कमी पडणार नाही. व्यावसायिकदृष्टय़ा लवचीकपणा वाढेल. नोकरदार वर्गाला कामावर सगळे सुरळीत असतानासुद्धा अस्वस्थता वाटू लागेल. आर्थिक बचत करा. दिनांक १२ तारखेचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. या चांगल्या कालावधीत नवीन कामाचा शुभारंभ होईल. बरेच दिवस ज्या कामांना सुरुवात होत नव्हती ती कामे पूर्ण होतील.
कुंभ : वाद – विवाद करताना जास्त खोलात जाऊ नका. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवा. कामात अल्प यश मिळेल. समाधानाची भावना अनुभवाल. कोणताही निर्णय घेताना द्विधावस्था होणार नाही. धाडसी वृत्ती राहील. व्यावसायिकदृष्टय़ा नफा चांगला मिळेल.नोकरदार वर्गाला अधिकार मिळेल. आर्थिक बाबतीत चढ-उतार राहणार नाही. समतोल स्थिती राहील. या आठवडय़ात सर्वच दिवस चांगले आहेत. जे आपल्याला साध्य करायचे आहे आणि आतापर्यंत होत नव्हते ते आता साध्य होणार आहे. इतरांवर अवलंबून काम होत नाही याचा अनुभव तुम्हाला आला असेल आणि हा अनुभव तुमच्यासाठी काही वाईट नाही.
मीन : आज कोणाशीही मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे. आज आर्थिक देवाण – घेवाण सावधपणे करावी लागेल. आप्त स्वकीयांशी वाद होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य साधारणच राहील. चांगली वेळ आहे तोपर्यंत स्वस्थ बसू नका. स्वत:च्या जबाबदारीवर घेतलेले निर्णय योग्य राहतील. इतरांचा विचार करण्याची गरज भासणार नाही. व्यावसायिकदृष्टय़ा अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक लाभ होईल. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. मानसिक समाधान लाभेल. प्रकृती साथ देईल.