मेष : प्रकृती उत्तम राहील
दिनांक २५, २६ हे दोन दिवस फारसे अनुकूल नाहीत; तेव्हा चांगल्या गोष्टीचा श्रीगणेशा या दिवसांत करू नका. चांगल्या गोष्टीसाठी उशीर लागणार आहे हे गृहीत धरा, म्हणजे त्रास होणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. चांगल्या दिवसांमध्ये चांगल्या घटना घडतील.
वृषभ – दिनांक २० रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी शुभ असेल. चंद्र ग्रहाचे भ्रमण २१ तारखेपासून ते २६ तारखेपर्यंत भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. असे भ्रमण म्हणजे दुधात साखर. कितीही अडचणी येऊ देत तुम्ही डगमगून जात नाही हे तुमच्या राशीचे वैशिष्ट्य.
मिथुन – दिनांक २१, २२ या दोन दिवसांत काय करावे काय करू
नये हे सुचणार नाही; कारण नेहमीपेक्षा जास्त काम करावे लागेल. परिणामी कामाचे नियोजन व्यवस्थित होणार नाही. विनाकारण धावपळ होईल आणि ती झाली की तुमची मानसिकता बिघडणार. काहीच करू नये असे वाटेल.
कर्क – षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. असे भ्रमण म्हणजे दुधात मिठाचा खडा, त्यामुळे सतर्क राहून काम करावे लागेल. प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे करून चालणार नाही. इतरांचे ऐकून घेण्याची मानसिकता ठेवावी लागेल आणि तरच दिवस चांगले जातील. न पटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा, म्हणजे तुमचा रागाचा पारा वाढणार नाही.
सिंह – सध्या शुभ ग्रहांची साथ कमी मिळणार आहे असे धरून चला. म्हणजे काय तर, जास्त प्रयत्न करावे लागतील. मनासारखे यश मिळणार नाही. प्रत्येक गोष्टीत घाई करावीशी वाटेल. इतरांनी सल्ला दिलेला आवडणार नाही. पण काय असते, काही वेळा इतरांचा सल्लाही आपल्याला उपयोगी पडतो. म्हणून सल्ला घेणे आवश्यक आहे.
कन्या – दिनांक २३, २४ हे दोन दिवस फारसे अनुकूल नाहीत. तुमच्या राशीचे वैशिष्ट्य म्हणजे सगळे दिवस सारखे समजून पुढे चालायचे हे बरोबर आहे. मात्र ज्यावेळी दिवस अनुकूल नसतात, त्यावेळी काही गोष्टी अंगलट येतात हे विसरू नका. त्या दिवशी काम करायचे नाही असे नाही.
तुळ – दिनांक २५, २६ या दोन दिवसांत महत्त्वाचे निर्णय घेताना विचार करा. अनोळखी व्यक्तीशी दोन हात लांब राहा. कोणतीही गुंतवणूक करताना विचार करा. काम वेळेत व्हावे म्हणून पर्यायी मार्ग स्वीकारू नका. इथेच तुमची फसगत होऊ शकते. प्रत्येक कामाचा आराखडा व्यवस्थित तयार करा आणि मगच कामाला लागा.
वृश्चिक – कामांना गती मिळेल
शुभ ग्रहांची साथ असल्यावर प्रलंबित कामांना गती नक्कीच येणार. आतापर्यंत फक्त मनामध्ये तुमच्या ठरत होते की, हे असे करायचे, ते तसे करायचे. पण सध्या मात्र हे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे, त्यामुळे तुम्हाला कोणतेही काम करताना अडचणीचे वाटणार नाही.
धनू : मानसिक समाधान लाभेल
या आठवड्यात सर्व दिवस आनंदाचे असतील. बऱ्याच दिवसांतून असे ग्रहमान आले आहे असे म्हणायला हरकत नाही; पण एक गोष्ट मात्र तुमच्या बाबतीत नक्कीच खरी आहे. ती म्हणजे मिळालेले सुख बोचते. ज्या वेळी दिवस चांगले असतात त्या वेळी तुम्ही तुमचे काम करून घेत नाही.
मकर : चंचल वृत्ती राहील
दिनांक २० रोजीचा एकच दिवस शुभ नाही. या दिवशी कोणत्याही महत्त्वाच्या करारावर सही करू नका. कोणाला भेटण्याचा आग्रह करू नका. चंचल वृत्ती राहील. हा दिवस सोडल्यानंतर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. दिवस चांगले जरी असले तरी तुमची वृत्ती नेहमी चंचल राहते.
कुंभ : व्यावहारिक राहा
दिनांक २१, २२ हे दोन दिवस अनुकूल कसे जातील ते पाहा. कारण या दिवसांत ‘एक गाव बारा भानगडी’ असे होऊन बसेल. म्हणून कोणाच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका. ‘आपले काम भले नि आपण भले’ हे सूत्र लक्षात ठेवा, म्हणजे त्रास होणार नाही.
मीन : देवाणघेवाण टाळा
दिनांक २३, २४ हे दोन दिवस चढउतारांचे आहेत. म्हणजे याच दिवसांत तुम्हाला कर्ज करण्याचा मोह निर्माण होतो. कारण नसताना याला जामीन हो, त्याला जामीन हो असे उद्याोग सुचतात आणि आगामी काळात गोष्टी अंगलट येतात.