मेष : प्रत्येक गोष्टीसाठी धीर धरावा लागेल. उचलली जीभ लावली टाळय़ाला, असे करणे त्रासदायक ठरेल. स्वत:चे मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. अमावास्या कालावधीत सहनशीलता ठेवा. एखाद्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावू नका. त्यामुळे होणारे नुकसान टाळता येणार नाही. व्यवसायात एकाच वेळी अनेक बदल करू नका. गुंतवणूक कमी प्रमाणात करा. नोकरदार वर्गाला कामात व्यस्त राहावे लागेल. आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे कल राहू द्या.
वृषभ : आपल्या बोलण्याने कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. त्यामुळे गरजेचे तेवढेच बोला, म्हणजे पुढील अनर्थ टळेल. चांगल्या गोष्टींसाठी स्वत:मध्ये बदल करावा लागेल. संयम ठेवून वागावे लागेल. न झेपणाऱ्या गोष्टींची जबाबदारी घेऊ नका. व्यवसायातील परिस्थिती लक्षात घ्या. उधारीचा व्यवहार टाळा. नोकरदार वर्गाने आपले काम दुसऱ्याच्या भरोशावर करून चालणार नाही. आर्थिक खर्च कमी करा.
मिथुन : दिनांक २३ तारखेला दुपारनंतर २४, २५ तारखेला संपूर्ण दिवस असा हा कालावधी जेमतेम राहील. या कालावधीत अनोळख्या व्यक्तींपासून लांब राहा. बेकायदेशीर गोष्टींना थारा देऊ नका. इतरांचे मत ऐकून घ्या. त्यावर कृती करण्यात घाई करू नका. स्वत:चे निर्णय स्वत: घ्या. अमावास्या प्रहरात सर्व काही चांगले असताना उदास वाटेल. बाकी दिवस चांगले जातील. व्यवसायातील कोणतेही धाडसी निर्णय घेताना आपली आवक पहिल्यांदा पाहा. नोकरदार वर्गाने आपल्या स्वत:च्या कामाव्यतिरिक्त इतरांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळा. आर्थिक बाबतीत बचत कशा पद्धतीने करता येईल याकडे लक्ष द्या.
कर्क : सहज मार्गाने कामे होत राहतील. ज्या व्यक्तींकडून तुम्हाला मदतीची अपेक्षा आहे ती अपेक्षा वेळेतच पूर्ण होईल, तेव्हा आता चांगल्या कामासाठी उशीर लावू नका. त्याचा श्रीगणेशा लवकरच सुरू करा. अमावास्या कालावधीसुद्धा अनुकूल राहील.व्यवसायातून मिळणारे उत्पन्न योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. भागीदारी व्यवसायातून फायदा होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या मागणीनुसार योग्य तो समन्वय साधता येईल. आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनाल. सामाजिक क्षेत्रात अनेकांशी सुसंवाद साधाल. मैत्रीचे नाते दृढ होईल.
सिंह : सर्व दिवसांचा कालावधी उत्तम जाईल. आलेल्या संधीचा फायदा करून घ्याल. स्वत:बरोबर दुसऱ्यांचाही विचार कराल. अमावास्या कालावधीत महत्त्वाचे व धाडसी निर्णय घ्याल. व्यावसायिकदृष्टय़ा होत असणारा त्रास कमी होईल. व्यवसायात नवीन उत्पन्नाचे पैलू समोर येथील. कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. नोकरदार वर्गाला योग्य मार्गदर्शन मिळेल. आर्थिकदृष्टय़ा भरभराट होईल.
कन्या : काही दिवस त्रासाचे राहिले त्यावर मात करून पुढे जाणे योग्य, हे मात्र ठाम ठरवून तुम्ही पुढे गेलात. त्यामुळे सध्याचे दिवस चांगले आहेत असे जाणवेल. अमावास्या कालावधीही चांगला जाईल. व्यवसायात पूर्वीपेक्षा सध्याची परिस्थिती चांगली असेल. व्यवहाराच्या गोष्टी रोखठोक होतील. गुंतवणुकीत वाढ होईल. नोकरदार वर्गाचे निर्णय यशस्वी होतील. राजकीय क्षेत्रात पुढाकार घेऊन कामाला सुरुवात कराल. कुटुंबातील सदस्यांची आवड-निवड जपा.
तूळ : दिनांक २० रोजी संपूर्ण दिवस व २१ तारखेला दुपापर्यंत या कालावधीत महत्त्वाचे कोणतेही निर्णय घेऊ नका. वादविवाद या गोष्टीपासून लांब राहा. बाकी दिवस चांगले असतील. या चांगल्या दिवसांमध्ये कामाचे योग्य असे नियोजन करा. त्यामुळे लांबलेल्या गोष्टी लवकर होऊ लागतील. व्यवसायात संधी उपलब्ध होईल. त्याचा पुरेपूर वापर करून घ्या. भागीदारी व्यवसायापासून दूर राहा. नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात घाईगडबडीने करून चालणार नाही. योग्य ती नियमावली लक्षात घ्यावी लागेल. पैशाच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी कमी होतील.
वृश्चिक : अमावास्या कालावधीत वाद होणार नाही याची काळजी घ्या. कुठेही उग्र रूप धारण करू नका. बाकी दिवस चांगले असतील. २१ तारखेला दुपारनंतर २२, २३ संपूर्ण दिवस स्वत:हून एखाद्या गोष्टीचा मनस्ताप ओढवून घेऊ नका. आपले काम कोणाच्या हाती सोपवले तर ते होणारच नाही हे गृहीत धरून चाला. त्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. व्यवसाय वाढीसाठी काही वेगळा विचार करत असाल तर हरकत नाही. पण त्यासाठी डोक्यावर नेहमी टांगती तलवार राहणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. नोकरदार व्यक्तींच्या कामांमध्ये परिवर्तन घडेल.
धनू : आपले मत इतरांवर लादू नका. कोणाशीही बोलताना शब्द जपून वापरा. या कालावधीत सहनशीलता ठेवून दिवस पार पाडावे लागतील. अमावास्या कालावधीत क्रोधावर नियंत्रण ठेवा. व्यवसायातील स्थिती समाधानाची असली तरी स्पर्धा करून चालणार नाही. प्रथम आपल्या फायद्या-तोटय़ाचा विचार करा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून बरेच काही शिकावयास मिळेल. कर्जाचा बोजा वाढवू नका. २३ तारखेला दुपारनंतर २४, २५ संपूर्ण दिवस नको ते धाडस करून चालणार नाही. परिस्थिती कोणत्याही प्रकारची असू द्या. पण वर्तमानात जगायला शिका. अनुभवातून शिकलेल्या गोष्टी विसरू नका.
मकर : दिनांक २६ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवस चांगले जातील. कोणत्याही गोष्टीसाठी पळापळ करावी लागणार नाही. तुमच्या कामाची जबाबदारी इतरांवर सोपवून तुम्ही ते करून घेऊ शकता. तुम्हाला स्वत:ला वेळ द्यावा लागणार नाही. अमावास्या प्रहर चांगला जाईल. व्यावसायिक वाटचाल उत्तम राहील. व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाची त्वरित परतफेड कराल. त्यामुळे कामातील उत्साह वाढेल. नोकरदार वर्गाला कामाचा आढावा घेताना वरिष्ठांची मदत मिळेल. आर्थिकदृष्टय़ा बचतीत वाढ होईल.
कुंभ : अमावास्या प्रहर चांगला जाईल. व्यवसायिकांना ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा करणे शक्य होईल. व्यवसाय वाढीसाठी केलेल्या जाहिरातींचा फायदा होईल. नोकरदार वर्गाला हाती घेतलेले कामे मार्गी लावता येतील. आर्थिक नियोजन परिपूर्ण असेल. राजकीय क्षेत्रात प्रगतीकडे वाटचाल राहील. मित्रांसोबत मनोरंजन होईल. दिनांक २० रोजी संपूर्ण व २१ तारखेला दुपापर्यंत कालावधी सोडला तर बाकी दिवस चांगले असतील. ज्या गोष्टींविषयी आतुरता वाटत होती ती लवकरच पूर्ण होईल. सर्व सूर कसे जुळून आलेत असेच वाटेल.
मीन : दिनांक २१, २२, २३ रोजी प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठेवावी लागेल. बेसावधपणे कोणतीही गोष्ट करू नका. कोणतेही व्यवहार भावनिक होऊन करण्यात अर्थ राहणार नाही. त्यामुळे नुकसान होऊ शकते. जिथे वादाचा प्रसंग येईल अशा ठिकाणी समजुतीने वाटचाल करा. व्यवसायात नवीन घडामोडी चांगल्या ठरतील. बऱ्याच दिवसांपासून जे ध्येय होते ते पूर्ण होईल. नोकरदार वर्गाच्या तांत्रिक अडचणी कमी झाल्यामुळे कामकाजात गती येईल. आर्थिक बाबतीत खर्च जपून करा. राजकीय क्षेत्रातील सूत्रे हाती येतील. भावंडांच्या बोलण्या वागण्याचा राग आला तरी निमूटपणे सहन करा.