मेष : प्रेमसंबंधात वेळ अनुकूल असेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी प्रवास करण्याचा निर्णयही घेऊ शकता. आठवड्याच्या शेवटी तुमचे प्रेम संबंध दृढ होण्यासाठी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. हलगर्जीपणाने कोणतीही गोष्ट करणे त्रासाचे राहील. तेव्हा सतर्क राहूनच प्रत्येक गोष्ट करायला हवी हे मात्र लक्षात ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. श्री गणेश चतुर्थी उत्साहात पार पाडाल. मात्र गौरी आवाहना दिवशी शांततेच्या मार्गाने दिवस पार पाडा. टोकाचे अंतर गाठू नका. नोकरदारवर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष देऊ नका. आपले काम चोख करा. व्यवसायात फार मोठय़ा गुंतवणुकीच्या नादी लागू नका. उधारीचे व्यवहार टाळा. आर्थिकदृष्टय़ा खर्च कमी करा. सार्वजनिक क्षेत्रात वेळेला महत्त्व द्या. कौटुंबिक कलह वाढू देऊ नका. धार्मिक गोष्टीतील उत्साह टिकवून ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या.
वृषभ : या आठवड्यात तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप समाधानी असाल आणि तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात सुखद अनुभव येतील. तुमच्या जोडीदाराशी तुमचा परस्पर सामंजस्य सुंदर असेल आणि जीवनात आनंदाची कमी नसेल. आठवड्याच्या शेवटी, वृद्ध व्यक्तीमुळे तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. गणेश चतुर्थी दिवशी प्रसन्न वातावरणात गणेशाची आराधना करा. दिवस आनंदात घालवण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीतून काही साध्य होणार नाही अशा गोष्टींचा विचार करू नका. मात्र गौरी आवाहन उत्साहात साजरे कराल. नोकरदारवर्गाच्या मनोकामना पूर्ण होतील. व्यवसायातील डावपेच वेळीच लक्षात आल्याने नुकसान होणार नाही. रोखीचे व्यवहार फायद्याचे ठरतील. कामकाजात गती येईल. अनावश्यक खर्च टाळा. मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी होतील कौटुंबिक आनंद मिळेल.
मिथुन : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात चिंता वाटू शकते आणि एखाद्या स्त्रीमुळे परस्पर तणावही वाढू शकतो. संवादातून प्रश्न सोडवले तर चांगले परिणाम समोर येतील. आठवड्याच्या शेवटी, आपण आपल्या प्रियजनांच्या सहवासात आनंददायी वेळ घालवाल. गणेश चतुर्थीला श्री गणेशाचे आगमन सर्वासोबत मोठय़ा उत्साहाने साजरे कराल. आनंदीमय वातावरण निर्माण होईल व उत्साह वाढेल. गौरी आवाहना दिवशी कोणत्याही प्रकारचा गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. कुठेही उग्र रूप धारण करू नका. नोकरदारवर्गाला मनासारखे सुट्टीचे बेत आखता येतील. व्यावसायिकदृष्टय़ा काही बदल करावे लागतील. या बदलामुळे प्रगती होईल. आर्थिकदृष्टय़ा बचतीत वाढ होईल. सामाजिक माध्यमांद्वारे केलेली जाहिरात प्रसिद्धी मिळवून देईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा पािठबा राहील.
कर्क : प्रेमसंबंधात वेळ अनुकूल राहील आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सहवासात आनंददायी वेळ घालवाल आणि तुम्ही कुठेतरी प्रवास करण्याचा विचारही करू शकता. परस्पर प्रेम मजबूत होईल आणि वेळ अनुकूल असेल. मात्र, आठवड्याच्या शेवटी मन भावूक राहीलगणेश चतुर्थीला श्री गणेशाचे आगमन मोठय़ा थाटाने कराल. स्वप्नवत कल्पना पूर्ण होतील. गौरी आवाहनही उत्साहाने कराल. नोकरदारवर्गाला सर्व काही चांगले असताना कामाचा कंटाळा येईल. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत आळस करू नका. व्यवसायात जबाबदारीने निर्णय घ्या. प्रत्येक गोष्टीत अंदाज वर्तवून चालणार नाही. भावनिक गोष्टी सध्या बाजूला ठेवा. व्यावहारिक राहण्याचा प्रयत्न करा. आर्थिकदृष्टय़ा खर्च कमी होतील. समाजसेवा करताना वरिष्ठांना विश्वासात घ्या. मुलांसोबत धमाल कराल. कौटुंबिक जीवन सुखाचे राहील.
सिंह : प्रेमसंबंधात वेळ आनंददायी जाईल आणि परस्पर प्रेम वाढेल. तुम्ही तुमच्या प्रेम जीवनासोबत चांगल्या ठिकाणी जाण्याचा निर्णय देखील घेऊ शकता. हे देखील शक्य आहे की, हा आठवडा तुमच्या नात्यात काही बळ आणेल. एखाद्या कामाचे काय आणि कसे करावे याचा विचार करावा लागणार नाही. सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. गणेशाचे आगमन सर्वासोबत मोठय़ा उत्साहाने साजरे कराल. तसेच गौरी आवाहनही तेवढय़ाच उत्साहाने साजरी कराल. पाहुणे मंडळींचे आगमन राहील. नोकरदार वर्गाला कामाचा ताण हलका होईल. व्यवसायात खरेदी-विक्री व्यवहारातून मोठय़ा प्रमाणात नफा होईल. स्वतंत्र व्यवसायाला महत्त्व द्याल. आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनाल.
कन्या : या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रेमप्रकरणाबद्दल आनंदी असाल आणि तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या कुटुंबाच्या सहवासात आनंद साजरा कराल.गणेश चतुर्थीला श्री गणेशाचे स्वागत कुटुंबासोबत मिळूनमिसळून कराल. गौरी आवाहनाचा दिवस तसा खासच असेल. नोकरदारवर्गाला महत्त्वाच्या कामांसाठी वेळ द्यावा लागेल. व्यवसायात ग्राहकांच्या सोयीसाठी योग्य उपाययोजना कराल. इतरांच्या सल्ल्याचा फायदा होईल. आर्थिक बाबतीत व्यवहार रोखठोक कराल. राजकीय क्षेत्रात सध्या उत्साह वाटणार नाही. भावंडांना तुमच्या आधाराची गरज वाटेल. कौटुंबिकदृष्टय़ा जबाबदारी पार पाडाल.
तूळ : या आठवड्यात तुमच्या प्रेम जीवनात हळूहळू रोमान्सचा प्रवेश होत आहे आणि जीवनात सुख-समृद्धीचे शुभ संयोग घडतील. तुमच्या प्रयत्नांमुळे आठवड्याच्या शेवटी शांतता मिळेल. आपण आणि आपले काम भले एवढेच लक्षात ठेवा. त्यानंतरचा कालावधी चांगला असेल. गणेश चतुर्थीदिवशी सकाळच्या प्रहरात पळापळ होईल. मात्र राग राग करणे टाळा. गौरी आवाहन प्रसन्न वातावरणात कराल. नोकरदारवर्गाला नवीन कामाचा अंदाज येईल. व्यवसायात व्यक्ती ओळखीची असो वा अनोळखी, व्यवहार जपून करा. व्यावसायिक संकल्पना मार्गी लागतील. आर्थिकदृष्टय़ा खर्च आटोक्यात ठेवा. राजकीय क्षेत्रातील अनुभव विसरू नका.
वृश्चिक : या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या बाजूने थोडा संयम बाळगून कोणताही निर्णय घ्यावा, अन्यथा तुमचे स्पष्ट बोलणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. तसेच, सप्ताहाच्या शेवटी तुम्ही सतर्क राहा. कितीही शांत राहण्याचा प्रयत्न केला तरीही शांत राहावेसे वाटणार नाही. शांततेचा मार्ग स्वीकारावा लागेल हे मात्र विसरू नका. बाकी दिवस चांगले असतील. गणेश चतुर्थीदिवशी कोणालाही न दुखावता गणेशाचे आगमन उत्साहाने करा. गौरी आवाहनाचा दिवस आनंदी असेल. नोकरदारवर्गाने कामाचे नियोजन केले तर कामकाज वेळेवर पार पाडता येईल. व्यवसायात परिश्रमाचे फळ मिळेल. नव्या घडामोडींचा उगम होईल. आर्थिकदृष्टय़ा खर्च जपून करा.
धनु : प्रेमाच्या नात्यात परस्पर प्रेम मजबूत होईल आणि तुम्ही तुमच्या आयुष्याच्या जोडीदारासोबत तुमच्या सुंदर भविष्यासाठी काही ठोस निर्णय देखील घेऊ शकता. सप्ताहाच्या शेवटी मन उदास असेल आणि काही बातम्या मिळाल्याने चिंता वाढू शकते. गणेश चतुर्थीदिवशी श्रीगणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी कराल. मात्र गौरी आवाहनादिवशी आपल्याकडून इतरांची मने दुखावली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. फटकळ बोलल्याने वाद वाढू शकतात. तेव्हा या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा. नोकरदारवर्गाला वरिष्ठांशी झालेल्या चर्चेतून अडचणीचा मार्ग मोकळा होईल. व्यावसायिकदृष्टय़ा केलेले प्रयत्न सफल होतील. अनपेक्षित लाभ होईल.आर्थिकदृष्टय़ा बचत करणे इष्ट राहील.
मकर : प्रेम संबंधात वेळ प्रतिकूल असू शकतो आणि परस्पर अहंकार देखील वाढू शकतो. शांतपणे परिस्थितीचे आकलन करून निर्णय घ्यावा, तरच शुभ परिणाम समोर येतील.गणेश चतुर्थीदिवशी प्रसन्नता वाटेल. श्रीगणेशाचे आगमन आनंदाने कराल. गौरी आवाहन तेवढय़ाच उत्सुकतेने साजरे कराल. हाती घेतलेले काम पूर्ण होईल. शुभ गोष्टींची सुरुवात होईल. नोकरदारवर्गाचे सुट्टीचे नियोजन अचानक मागेपुढे होण्याची शक्यता राहील. व्यावसायिकदृष्टय़ा स्थिरता प्राप्त होईल. आवक अपेक्षेपेक्षा जास्त वाढेल. आर्थिक लाभ होईल.
कुंभ : प्रेमसंबंधात वेळ अनुकूल राहील आणि परस्पर प्रेम वाढेल. तुम्ही तुमच्या प्रेम जीवनासोबत एखाद्या रमणीय ठिकाणी प्रवास करण्याचा निर्णयही घेऊ शकता. तसेच, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या बाजूने अधिक प्रयत्न करावे लागतील, तरच तुम्हाला समाधान मिळेल. गणेश चतुर्थीदिवशी दुपारनंतर उत्साह वाटेल. गौरी आवाहनाचा दिवस आनंदाचा असेल. सतत वाटणारे दडपण कमी होईल. नोकरदारवर्गाला कामाच्या बाबतीत आघाडी मिळवता येईल. व्यवसायात दुहेरी भूमिका करावी लागेल. उत्पादन वाढवताना नियोजन अचूक करा. आर्थिक मनसुबे पूर्ण होतील. राजकीय क्षेत्रातील सूत्रे हाती घ्याल.
मीन : या आठवड्यात प्रणय हळूहळू तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहे. प्रेम संबंधात परस्पर समंजसपणा देखील हळूहळू वाढेल आणि एक सुखद अनुभव येईल.सप्ताहाच्या शेवटी एक नवीन सुरुवात जीवनात आनंद आणेल. श्रीगणेश चतुर्थीदिवशी वातावरण प्रसन्न ठेवा. गौरी आवाहनाचा दिवस शुभ असेल. नोकरदारवर्गाने स्वत:च्या कामाची जबाबदारी पार पाडताना आळस बाजूला ठेवा. व्यवसायात नेहमीपेक्षा गुंतवणूक कमी करा. उधारीचा व्यवहार टाळा. आर्थिक बाबतीत खर्च कमी करा. सामाजिक माध्यमांचा वापर न केलेला चांगला. घरातील सदस्यांशी मतभेद ताणू नका.