TheClearNews.Com
Sunday, February 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscopes : साप्ताहिक राशिभविष्य : २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२३ !

जाणून घ्या...कसा जाईल तुमचा आठवडा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 29, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : धार्मिक गोष्टींची आवड राहील. मानसिक समाधान लाभेल. तडकाफडकी निर्णय बदलू नका. कर्जाचे व्यवहार करू नयेत. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. चांगले काम करून ते स्वतःसाठी स्थान निर्माण करू शकतील. तुमच्या भावांच्या सल्ल्याने केलेल्या कामात नक्कीच यश मिळेल, त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही गुंतवणुकीसाठी सल्ला घ्यायचा असेल तर तुमच्या भावांकडूनच घ्या.

वृषभ : धावपळ करताना सावधगिरी बाळगावी लागेल. जुनी कामे पूर्ण करता येतील. प्रवासात काळजी घ्यावी. आपली प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा रुग्णालयात दाखल होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीत काही बिघाड होऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल, तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागतील. राजकीय क्षेत्रात काम करण्याची म्हणावी अशी उत्सुकता वाटणार नाही. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

मिथुन : व्यवसायात जुने काही व्यवहार बाकी असतील तर ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. जुन्या आजारांकडे लक्ष ठेवावे. नोकरीच्या दिशेने काम करणाऱ्यांना आज चांगल्या संधी मिळतील. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला असेल तर तुम्हाला त्यात नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

कर्क : व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. आपल्या अनेक योजना ज्या मंदावल्या होत्या त्या आता पूर्णत्वास जातील. उगाच चिडचिड करू नका. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडू शकते. परिश्रमात कमी पडू नका. तुमच्या वडिलांच्या किंवा कोणत्याही अधिकाऱ्याच्या कृपेने तुम्हाला एखादी वस्तू किंवा संपत्ती मिळू शकते. आपले काम इतरांनी करावे ही अपेक्षा सोडून द्या. ही अपेक्षा सोडली तर त्रास होणारच नाही. आपले काम इतरांनी करावे ही अपेक्षा सोडून द्या. ही अपेक्षा सोडली तर त्रास होणारच नाही.

सिंह : ह्या आठवड्यात आपली प्राप्ती सामान्यच राहील. आरोग्य सुद्धा सामान्यच राहील. विवाहितांना त्यांचे वैवाहिक जीवन अधिक सुखद करण्यासाठी आपल्या पूर्वीच्या चुका स्वीकारून जोडीदाराशी संवाद साधावा लागेल मानसिक आंदोलन ओळखून वागावे. मानसिकतेचा परिणाम इतरांवर पडू देऊ नका. तुम्हाला कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो हुशारीने घ्या, कोणाच्याही फसवणुकीत पडू नका, अन्यथा तुमच्यासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. व्यवसायातून अनपेक्षित असा फायदा होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या शाब्बासकीची थाप मिळेल.

कन्या : आपले प्रयत्न व काम करण्याची गती उत्तम असल्याने नोकरीत आपली स्थिती उंचावल्याचे आपणास जाणवेल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनातील तणावातून बऱ्याच प्रमाणात बाहेर पडल्याचे दिसून येईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. आवडीच्या गोष्टी करता येतील. तुमच्या बहिणीच्या लग्नात काही अडथळे येत असतील तर तुम्ही तुमच्या एखाद्या नातेवाईकाच्या मदतीने तोडगा काढण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न हे चांगले असेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून कामाच्या बाबतीत कौतुक केले जाईल. आर्थिक लाभ होईल.

तूळ : तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य आणि साहचर्य मिळत असल्याचे दिसते. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांना एकमेकांप्रती आदर वाढेल. आपल्या व्यावसायिक भागीदाराशी भांडण होण्याची संभावना आहे. तेव्हा सावध राहावे. त्यांच्याशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करावा. नोकरीत चढ – उतार येतील. जवळच्या व्यक्तीची भेट होईल. घाईघाईने कोणतीही गोष्ट करू नका. बोलताना भान राखावे. व्यवसायात कोणतेही उधारीचे व्यवहार करू नका. नोकरदार वर्गाने वरिष्ठांच्या सूचनांचे पालन केल्यास कामाचा व्याप वाढणार नाही.

वृश्चिक : जाणून घ्या…कसा जाईल तुमचा आठवडा !खर्चात इतकी वाढ होईल कि त्यावर आपणास नियंत्रण ठेवावेच लागेल. अन्यथा आपली आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. कौटुंबिक समाधान शोधाल. आपले प्रयत्न कमी पडू देऊ नका. संयम बाळगून परिस्थिति हाताळावी. विवाहयोग्य लोकांसाठी चांगल्या संधी मिळतील. तुम्हाला तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल, अन्यथा बाहेरच्या व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात. आर्थिक बाबतीत नियोजन करा. समाजमाध्यमांपासून लांब राहा. शेजाऱ्यांशी जेवढय़ास तेवढे राहा.

धनू : व्यापारी आपल्या व्यावसायिक भागीदारामुळे खूप मोठा लाभ मिळवू शकतील. आठवड्याचा पहिला दिवस प्रवासास अनुकूल आहे. अचानक धनलाभ संभवतो. छानछोकीसाठी खर्च कराल. ज्ञानात भर पडेल. कोणत्याही कायदेशीर प्रकरणात जात असाल तर तुमच्या वडिलधाऱ्यांचा सल्ला घेण्यात काही गैर नाही. चांगली वेळ येण्यासाठी वाट पाहावी लागते. असेच हे दिवस आहेत. हे दिवस पुढे ढकलण्याचा फक्त प्रयत्न करा.

मकर : जर आपल्या पदोन्नतीची वेळ आली असेल तर ती ह्या आठवड्यात होऊ शकते. पगारवाढ सुद्धा संभवते. आपण मात्र अति आत्मविश्वासाने चुकीची कामे करू नयेत. पत्नीशी वाद घालू नका. गैरसमजाला मनात थारा देऊ नका. अनावश्यक खर्च संभवतो. तुम्हाला तुमच्या व्यवसायात अचानक बदल करावे लागतील. तुमच्या जोडीदारासोबत काही वाद सुरू असतील तर तेही संपतील. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यावसायिक वाढ करण्यासाठी जाहिरात माध्यमांचा वापर करा. त्याचा आगामी काळासाठी फायदा होईल.

कुंभ : प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या मनात काहीही न ठेवता आपल्या प्रेमिके समोर आपले विचार मोकळेपणाने मांडावेत. जोडीदाराला खुश करावे लागेल. खर्च मर्यादित ठेवावा. फसवणुकीपासून सावध राहावे. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना आज बढती मिळू शकते. तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करणार असाल तर त्यासंबंधी चौफेर विचार करा. आपले काम दुसऱ्यांनी करावे अशी गरज भासणार नाही. स्वत:च्या हिमतीवर स्वत:चे काम कराल.

मीन : आठवड्याच्या अखेरीस बँकेतील शिल्लक वाढवू शकाल. कौटुंबिक जीवन सुखद होईल. विवाहितांना किरकोळ वादांना सामोरे जावे लागू शकते. असे असले तरी त्यांचे नाते टिकून राहील. व्यवसायात प्रगती करता येईल. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. मुलांशी मतभेद संभवतात. तुम्ही जे काही कमावता त्यातील काही भाग बचत म्हणून ठेवा, तरच तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकाल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी देखील ऐकायला मिळू शकते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

धरणगाव कॉंग्रेसच्या शहर कार्यालयाचे नाना पटोले यांच्या हस्ते उदघाटन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अजून मी राष्ट्रवादीकडे वळलेलो नाहीय, त्यामुळे अजित पवार…. : नारायण राणे

August 29, 2021

बुलडाण्यात संपत्तीसाठी दत्तकपुत्राने केला बापाचा खून

October 9, 2020

माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांची धरणगावच्या भाजप कार्यालयास सदिच्छा भेट !

April 8, 2023

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण : पीडितेच्या कुटुंबियांना न्याय पाहिजे : राहुल गांधी

August 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group