मेष : जवळच्या व्यक्ती नाराज होतील. काळजी घ्या. विरोधक गुप्त कारवाया करतील. मोह, व्यसन नको. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुमच्या विचारांचा प्रभाव राहील. तुम्हाला मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभावी मुद्दे तयार करून सर्वांना चकित कराल. नोकरी व व्यवसायात तुम्हाला सुयश लाभणार आहे. आपले काम भले नि आपण भले असे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवा. अमावास्या कालावधी चांगला जाईल.
वृषभ : सार्वजनिक कार्यात पुढे राहाल. तुमच्या क्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण राहील. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. मानसिक ताकद वाढणार आहे. आज तुम्ही जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. तुमच्या विचारांचा सर्वत्र प्रभाव राहील. नम्रता व संयम राखा. वरिष्ठांना मदत करावी लागेल. कार्याचा आढवा घेऊन तत्परता दाखवावी लागेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये संधीचे सोने करा. येणारे प्रस्ताव स्वीकारा.
मिथुन : सहनशीलता ठेवा. यश मिळवता येईल. सार्वजनिक कामात सावध राहा. नोकरीत हुशारी दाखवाल. धंद्यात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. महत्त्वाच्या आर्थिक कामांसाठी आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. कोणतेही कठीण काम रेंगाळत ठेऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मनाप्रमाणे संधी घेता येईल. प्रतिष्ठा राहील. व्यवसायातील जुनी येणी वसूल करण्यासाठी प्रयत्नरत राहाल. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल. तांत्रिक अडथळे कमी होतील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून चांगले काम केल्याची पोचपावती मिळेल.
कर्क : कोणत्याही कामाची सुरूवात करू शकाल. अनेक कठीण कामे मार्गी लागतील. नोकरी लागेल. तुमचा उत्साह व उमेद विशेष असणार आहे. अनेकांना तुमच्या कामाचे कौतुक वाटेल. आरोग्य उत्तम राहील. परदेशात जाण्याचा योग येईल. धंद्यात उलाढाल यशस्वी होईल. थकबाकी मिळवा. आजचा दिवस आपल्याला अनेक बाबतीत अनुकूल असणार आहे. मनोबल उत्तम राहील. व्यवसायातील परिस्थिती उत्तम असेल. नोकरदार वर्गाला नवीन नोकरीचे प्रस्ताव येतील. आर्थिक लाभ होईल.
सिंह : क्षेत्र कोणतेही असो धावपळ वाढेल. नम्रता ठेवा. कायद्याच्या कक्षेत राहून वक्तव्य करा. तणाव वाढेल. दूरदृष्टी ठेवा. मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. तुमच्या विचारांचा गोंधळ असणार आहे. आज आपल्याला अनुकूलता लाभणार नाही. वरिष्ठांचा दबाव राहील. लोकांचे सहकार्य मिळेल. स्पर्धा कठीण आहे. अनावश्यक खर्च संभवतात. काहींना दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. राजकीय क्षेत्रातील हालचालींचा मागोवा घ्या. भावंडांशी संवाद साधाल. शेजाऱ्यांना मदत कराल.
कन्या : क्षुल्लक वाद, गैरसमज होतील. अनाठायी खर्च होतील. मन अस्थिर राहील. नोकरीच्या कामात यश मिळेल. अनेकांशी सुसंवाद साधू शकणार आहात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुमच्या विचारांचा प्रभाव राहील. मोह, व्यसन नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मनातील भावना व्यक्त करताना काळजी घ्या. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काहींना विविध लाभ होणार आहेत. नोकरदार वर्गाला काम करताना वरिष्ठांशी जपूनच बोलावे लागेल. आर्थिकदृष्ट्या मोबदला चांगला मिळेल.
तुळ : दिशादर्शक कालावधी. थोरामोठय़ांच्या सहकार्याने कठीण समस्या सोडवाल. खरेदीविक्रीत लाभ होईल. तुमचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. नोकरीच्या ठिकाणी वर्चस्व लाभेल. धंद्यात क्षुल्लक वाद वाढवू नका. प्रवासाचे योग येतील. आपली अनेक कामे आज विनासायास पूर्ण होणार आहेत. व्यावसायिक चढ-उतार वेळीच लक्षात घ्या. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी घ्यावी लागेल.
वृश्चिक : अहंकाराची भाषा प्रतिमा डागाळेल. कायद्याच्या चौकटीत राहून मुद्दे मांडा. तुमचे मनोबल उाम असणार आहे. तुमच्या विचारांना योग्य दिशा सापडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही वाट पाहात असणारी संधी आपल्याला लाभणार आहे. कोर्टकचेरीच्या कामात चिंता जाणवेल. प्रयत्नांनी यश मिळेल. नम्रता ठेवा. आज तुम्ही चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामात सुयश मिळवणार आहात. मानसिक समाधान लाभेल. प्रकृती उत्तम राहील.
धनु : धंद्यात नम्रता ठेवा. हिशेब तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात टीका करताना सावध रहा. मानसिक अस्वस्थतेमुळे आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी. तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. प्रतिष्ठा राहील. सहकारी, नेते यांचे ऐकावे लागेल. तुमच्या कुटुंबात आज वाद विवादाची शक्यता आहे. शांत व संयमी राहावे. नोकरदार वर्गाचे कामात मन रमेल. आर्थिक लाभ होईल. समाजसेवेची आवड राहील.
मकर : थोरामोठय़ांचा अपमान करू नका. नोकरीत व्याप, चिंता राहील. धंद्यात लाभ होईल. सहनशीलता ठेवा. आज तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांचे मत ग्राह्य धरावे लागेल. चौफेर दबाव राहील. गणेश उत्सवात कामे वाढतील. आज आपल्याला आपल्या महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. तुमचा सर्वत्र प्रभाव राहील. नोकरदार वर्गाचा कामातील उत्साह टिकून राहील. उधारी करणे टाळा. नातेवाईकांशी जेवढ्यास तेवढे राहा.
कुंभ : रागाचा पारा कुठेही वाढवू नका. कौटुंबिक वाटाघाटीत यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. तुम्ही आपल्या मतांबद्दल अधिक आग्रही राहणार आहात. प्रत्येक दिवस उत्साह, आत्मविश्वास वाढवणारा आहे. प्रवासात घाई नको. नोकरीत मोठी संधी, बदल घडेल. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. व्यवसायात मोठी उलाढाल सध्या तरी करू नका. नोकरदार वर्गाने कामात लक्ष द्यावे.
मीन : क्षुल्लक वाद, गैरसमज होतील. अनाठायी खर्च होतील. मन अस्थिर राहील. आज तुम्ही तुमची बौद्धिक क्षमता सिद्ध करू शकणार आहात. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमच्या विचारांचा प्रभाव राहील. जवळच्या व्यक्ती नाराज होतील. काळजी घ्या. विरोधक गुप्त कारवाया करतील. आज तुम्ही आपल्या प्रियजनांना वेळ देणार आहात. आर्थिक नियोजन पक्के करा. समाजमाध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. मुलांची आवडनिवड पूर्ण करताना नको ते लाड करू नका.