मेष : आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपली आर्थिक स्थिती चांगली असेल. धार्मिक कार्याची आवड निर्माण होईल. कुटुंबातील लोकांसमवेत प्रवास कराल. आर्थिक प्रगती साधता येईल. करिअर आणि बिझनेसमध्ये तुम्हाला खूप फायदा होईल. मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. व्यावसायिकदृष्टय़ा प्रगती होईल. फायद्याचे प्रमाण चांगले राहील.
वृषभ : व्यापाऱ्यांना त्यांच्या परिश्रमाचे खूप चांगले परिणाम मिळतील. आपले व्यावसायिक भागीदार सुद्धा खूप मेहनत करतील. आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात. व्यायामाला कंटाळा करू नका. अचानक धनलाभाची शक्यता. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. शुभ राजयोगाच्या प्रभावामुळे तुम्ही नवीन कार, घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे त्वरित गुंतवणुकीत रूपांतर करा. त्याचा आगामी काळासाठी फायदा होईल.
मिथुन : नोकरीच्या ठिकाणी थोडा तणाव राहील. व्यापारात खर्च वाढण्याची संभावना आहे.लहान व्यवसायिकांना लाभ होईल. जनसंपर्कात वाढ होईल. जोडीदारासोबत मजेत वेळ घालवाल. तुम्हाला अनेक समस्यांपासून आराम मिळेल. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. व्यवसायात धरसोड वृत्ती टाळा. नोकरदार वर्गाला कामात व्यस्त राहावे लागेल.
कर्क : एखाद्या ठिकाणाहून थकबाकीचे पैसे सुद्धा येऊ शकतात. लॉटरी किंवा शेअर्स बाजारातून सुद्धा चांगला फायदा होण्याची संभावना आहे. विरोधकांपासून सावध राहावे. कोणावरही जास्त विश्वास ठेऊ नका. कोणालाही शब्द देऊ नका. राजयोगाच्या प्रभावामुळे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती कराल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. समोरच्याचेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा. स्पष्ट बोलल्याने होणारे कामही बिघडू शकते.
सिंह : कुटुंबात थोडा तणाव असेल. आपल्या मातेची प्रकृती बिघडू शकते. तिची काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न यश देतील. लॉटरी मधून लाभ मिळू शकतो. मनातील भावना मांडता येतील. नोकरीत पदोन्नती मिळू शकते. व्यवसायाचा विस्तार होईल. उत्पन्न वाढेल. व्यावसायिकदृष्टय़ा धनलाभ होईल. नोकरदार वर्गाच्या कामकाजात बदल होतील. राजकीय क्षेत्रात वर्चस्व गाजवाल. उधारीचे व्यवहार टाळा.
कन्या : आपली थकबाकी मिळू शकते. आपण जर कर्ज काढले असेल तर ह्या दरम्यान त्याची परतफेड करू शकाल. कौटुंबिक जीवनात समाधान लाभेल. कामाच्या ठिकाणी एकाग्रता ठेवावी. घरातील टापटीप कटाक्षाने पाळाल. प्रदीर्घ प्रलंबित कोर्ट केस तुमच्या बाजूने निघू शकते. तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या संपुष्टात येऊ शकते. व्यावसायिकदृष्टय़ा भरभराट होईल. नोकरदार वर्गाचे काम त्वरित पूर्ण होईल. आर्थिक मोबदला योग्य मिळेल.
तूळ : आपल्या प्राप्तीत वाढ होईल. खर्च तर होतीलच, परंतु प्राप्तीत वाढ झाल्याने आपणास काही त्रास होणार नाही. आज तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. विना संकोच बोलाल. जवळच्या मित्रांना घरी बोलवाल. निसर्गरम्य ठिकाणाला भेट द्याल. खाण्यावर नियंत्रण ठेवावे. नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात करावी लागेल. आर्थिकदृष्टय़ा समाधान लाभेल. व्यवसायात नवीन काही बदल करत असाल तर तो करावयास हरकत नाही. आर्थिक लाभ होईल.
वृश्चिक : ह्या आठवड्यात आपल्या खर्चात वाढ होईल. आपली प्राप्ती सुद्धा सामान्यच राहील. आवडीचे पदार्थ चाखाल. कौटुंबिक जीवनात काही सुखद अनुभव येतील. दिवस मनाजोगा घालवाल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. शेजाऱ्यांची मदत मिळेल. जोडीदाराची साथ मिळेल. व्यावसायिकदृष्टय़ा प्रगती होईल. फायद्याचे प्रमाण चांगले राहील. व्यवसायातील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करू नका. नोकरदार वर्गाने कामात लक्ष केंद्रित केलेले चांगले. खर्च कमी करा.
धनू : ह्या आठवड्यात संपत्तीशी संबंधित बाबी आपणास आकर्षित करू शकतील. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. बुद्धिमत्ता आणि विवेक यांचा मेळ घालावा. सूक्ष्म निरीक्षणावर भर द्यावा. नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. तुम्ही रागावर नियंत्रण ठेवले नाही तर तुमचे स्वत:चेच नुकसान होऊ शकते. न पटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. ह्या आठवड्यात आपणास तणावा पासून दूर राहावे लागेल.
मकर : कचेरीची महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खर्चात वाढ संभवते. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. मानसिक शांती मिळेल. आरोग्य उत्तम राहील. बाकी दिवसही चांगले असतील.व्यवसायात अपेक्षित फायदा होईल. नोकरदार वर्गाला कामाच्या व्यापात इतर गोष्टींत लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही. प्रवास लाभदायी होऊन व्यापारात लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकतील.
कुंभ : वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. मित्रांची उत्तम साथ मिळेल. व्यापार्यांना चांगला आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक जीवन सुखाचे राहील. जोडीदाराची साथ मिळेल. शारीरिकदृष्टय़ा योगसाधनेला महत्त्व द्या. आर्थिकदृष्टय़ा व्यवहार पूर्ण होतील. समाजसेवेमध्ये गुंतून राहाल. नातेवाईकांच्या मदतीला धावून जाल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील तणाव कमी होतील, ह्यात आपल्या सासुरवाडी कडील लोकांचा सुद्धा सहभाग असेल.
मीन : ह्या आठवड्यात आपण एखाद्या सोहळ्यात सहभागी व्हाल. ह्या आठवड्यात प्रेमीजन आपल्या प्रेमिकेस दूरवर फिरावयास घेऊन जाऊ शकतील. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. सहकार्यांशी होणारे मतभेद संपुष्टात येतील. घरगुती वातावरण चांगले राहील. वैवाहिक सुख लाभेल. उपासना फलद्रूप होईल. व्यवसायातील उधारी वेळेत वसूल होईल. त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक प्रश्न मिटेल. राजकीय क्षेत्रात मानसन्मान मिळेल.
















