भुसावळ (प्रतिनिधी) येथील इनरव्हील क्लब ऑफ भुसावळतर्फे औरंगाबाद रोडवर जनजागृती करणारे स्वागत बोर्ड लावण्यात आले आहे.
इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ आपल्या हार्दिक स्वागत करता है. आणी जागृकता करणार्या बोर्डाचे अनावरण, संगीता बियाणी व आरती चौधरी डाॅ. रश्मी शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
हा बोर्ड बियाणी मिलिटरी स्कूलच्या बाजूला लावण्यात आला आहे. ह्या बोर्डवर एका बाजूने “इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ तर्फे स्वागत” असे असून दुसऱ्या बाजूला “वाहतुकीच्या नियमांविषयी माहिती दिलेली आहे.अशाप्रकारच्या आणखीन बोर्ड शहरात लावून जनजागृती करणार असे इनरव्हील अध्यक्षा शीतल भराडे यांनी सांगितले.ऋचीका शर्मा आणी वंदीता पारे ह्यापण उपस्थितीत होत्या. इनरव्हीलच्या या जनजागृती उपक्रमा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.