मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. सध्या या आमदारांचे वास्तव्य गुवाहाटीतील रॅडीसन्स ब्ल्यू या हॉटेलमध्ये आहे. याच हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे दोन पदाधिकारी टेहळणी करतांना आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसही यात सक्रिय होताना दिसत आहे. शिंदेंसह त्यांच्या गटाचे वास्तव्य असलेल्या गुवाहाटीतील रॅडीसन्स ब्ल्यू या हॉटेलबाहेर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पदाधिकारी टेहळणी करीत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आता याबाबत चर्चांना उधान आले आहेत. कुशल करंजावणे आणि सुहास उभे असे या दोन पदधिकाऱ्यांची नावे आहेत. करंजावणे हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सचिव, तर उभे हे राज्य समन्वयक आहेत. हे दोघेही शुक्रवारी गुवाहाटीतील रॅडीसन्स ब्ल्यू दिसले. दोघं पदाधिकारी खासदार सुप्रियाताई सुळे यांचे निकटवर्तीय मानले जातात. दुसरीकडे गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून आणणारे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आज हॉटेलबाहेर पडले आहेत. संख्याबळ जमताच शिंदे यांनी गुवाहाटीहून थेट दिल्लीला रवाना झाले आहेत. शिंदे यांनी मातोश्रीविरोधात बंड पुकारत मी शिवसेनेतच असल्याचे म्हटले आहे.