जळगाव (प्रतिनिधी) शाळेतून घरी आल्यावर जेवण केलं, थोड्याच वेळात तरुणासोबत घडलं भयंकर ! येथील मेहरूण परिसरातील जय भवानी नगरातील एका तरुणाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. किशोर अंबादास नेरकर (वय ४५, रा. जय भवानी नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
किशोर नेरकर हे तो या. दे. पाटील शाळेजवळ आई, वडील, भाऊ, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहतो. या. दे. पाटील शाळेत विनाअनुदानित तत्वावर शिपाई म्हणून तो कार्यरत होता. शनिवारी १६ डिसेंबर रोजी तो दुपारी शाळेतून साडेबारा वाजता घरी आला. त्यानंतर त्याने जेवण केले. काही वेळानंतर घरातच त्याला चक्कर येऊन तो खाली कोसळला. त्याच्या मुलांनी, वडील जमिनीवर कोसळल्याचे पाहताच शेजारच्यांना आवाज दिला.
कुटु ंबीय व आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे सीएमओ डॉ. सचिन पाटील यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मनमिळावू व चांगले व्यक्तिमत्व म्हणून परिसरात किशोर नेरकर यांची ओळख होती. दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबियांकडून माहिती जाणून घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
















