जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यासह जिल्ह्यात कोरोना महामारीमुळे हाहाकार माजला आहे. परंतू अशा कठीण परिस्थितीत तालुक्याचे आमदार गिरीश महाजन आहे तरी कुठं?, आरोग्यदूत आमदार दाखवा, अशा आशयाचे फलक घेऊन जामनेर शहर राष्ट्रवादीच्या वतीने पालिका चौकात अनोखे आंदोलन करण्यात आले.
जामनेर तालुक्यात कोरोनाने हाहाकार माजला असून तालुक्याचे आमदार गिरीश महाजन मात्र गायब आहेत. २५ वर्षांपासून लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने तालुक्यात थांबुन लोकांचे जीव वाचवावे, प्रशासनाला हाताशी धरून जनतेची सेवा करावी, हे काम सोडून आमदार साहेब भाजपाच्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत दंग आहेत. जनतेला वाऱ्यावर सोडून गायब असलेल्या आमदार साहेबांच्या चुकीच्या वागणुकी बद्दल जामनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने, “आमदार साहेब गेले तरी कुठं” आमदार दाखवा, अश्या आशयाचे पत्र दाखवून शहरातील चौकात अभिनव आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे विधानसभा प्रमुख किशोर पाटील, शहर अध्यक्ष जितेश (पप्पू) पाटील, सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष संदीप हिवाळे, युवक शहर अध्यक्ष विनोद माळी, युनूस भाई पहेलवान, सागर पाटील, किरण जंजाळ आणि अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
















