नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray)निधनानंतर शिवसेनेचे (Shivsena) सगळे अधिकार उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) स्वतःकडे घेतले आणि शिवसेना पक्षप्रमुख पद तयार केलं आणि हे पदच बोगस असल्याचा खळबळजनक युक्तिवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethamalani) यांनी निवडणूक आयोगातल्या सुनावणीवेळी करत मोठा ‘बॉम्ब’ टाकला आहे. (election Commission Of India)
‘शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब केंद्रीत होती, पण नंतर ती न बदलत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख असे नाव स्वत:साठी घेतले, पण त्यामुळे ते शिवसेनेचे प्रमुख होत नाहीत. बाळासाहेबांचं निधन झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडे सगळे अधिकार घेणार बदल केले. शिवसेनेच्या घटनेत बदल करणं हा बोगसपणा आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुखपदच बेकायदेशीर आहे,’ असा दावा एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे महेश जेठमलानी यांनी केला आहे. शिंदे गटाकडे आमदार, खासदार यांचे बहुमत आहे. तर धनुष्यबाण चिन्हासाठी बहुमत महत्वाचे असून ते आमच्याकडे आहे. ‘कायद्याच्या निकषावर शिंदे गटाची बाजू योग्य व भक्कम असल्याचा दावाही जेठमलानी यांनी केला आहे. शिवसेनेची घटना ही बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केली होती. बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेना कार्याध्यक्ष हे पद उद्धव ठाकरे यांना देण्यात आलं होतं. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर घटनाबाह्य पद्धतीने शिवसेना पक्षप्रमुख हे पद तयार केलं.
२०१८ मध्ये कुणालाही कल्पना न देता गुप्तपणे बदल केले. त्यामुळे त्यांचं पदच बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद आम्ही केला आहे. संख्यात्मक पाठबळ यांच्याकडे आमच्याकडे आहे. शिवसेना पक्ष प्रमुख या पदाला आमचा विरोध नाही. मात्र त्यांनी जे बदल या पदावर बसल्यावर केले त्या सगळ्यावर आमचा आक्षेप आहे असंही महेश जेठमलानी यांनी म्हटलं आहे. आज निवडणूक आयोगात शिंदे गटातर्फे युक्तिवाद करण्यात आला त्यात महेश जेठमलानी यांनी हे मत मांडलं.
तर युक्तवाद करताना कपिल सिब्बल म्हणाले, ‘केंद्रीय निवडणूक आयोगात प्राथमिक आहे की अंतिम हे स्पष्ट करा’. तर यावर निवडणूक आयोगाने आत्ताच सांगता येणार नाही, हे उत्तर दिले. ‘सुप्रीम कोर्टातील निकाल येईलपर्यंत आयोगात सुनावणी नको, अशी भूमिका घेतली. तर शिंदे गटाने सादर केलेले कागदपत्रे बोगस असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. सुप्रीम कोर्टात निर्णय होईपर्यंत आयोगाने सुनावणी घेऊ नये. किंवा मग आम्हाला सांगा की हा युक्तीवाद प्राथमिक आहे का अंतिम आहे? त्यानुसार आम्ही युक्तीवाद करू. सुप्रीम कोर्टाने बंडखोरांना अपात्र ठरवलं तर या आयोगाने दिलेला कोणताही निर्णय हास्यास्पद होईल, असं कपिल सिब्बल म्हणाले. दरम्यान निवडणूक आयोगात सुनावणी सुरू असतानाच संजय राऊत बाहेर पडले. कायमच पत्रकारांशी संवाद साधणारे राऊत निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून काहीही न बोलता निघून गेले, त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.