पुणे (वृत्तसंस्था) शिरुर तालुक्यातील केंदुर गावातुन एका धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने शारीरीक संबंध ठेवू न दिल्याने शरीरावर अनेक ठिकाणी चाकुने वार करत पतीने पत्नीची निघृण हत्या केली आहे. पत्नीच्या हत्येनंतर पती पोलीस स्टेशन स्वतःहुन हजर झाला.
आशा रामदास पवार असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. रात्रीच्या सुमाराम पती-पत्नी एकत्र झोपले असताना पती रामदास पवार याने पत्नीला शारीरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असताना पत्नी आशाने चापट मारुन ‘मला स्पर्श करु नकोस मला तुझी गरज नाही’, असं म्हटल्यानंतर पती रामदासला राग अनावर झाला. राग अनावर झाल्याने घरातील चाकुने पत्नीच्या अंगावर, डोके, कान, पोट आणि हातावर गंभीर वार केले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी होऊन तिचा जागीच मृत्यु झाला. त्यानंतर पत्नीचा जीव गेल्याची खात्री झाल्यानंतर पती रामदास पवार स्वतःहुन शिक्रापुर पोलीसांत जाऊन घटनेची माहिती दिली. त्यानुसार पतीवर पत्नीच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.