मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीपर्यंत धीर धरा असा सल्ला दिल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संवाद साधल्याचे कळतेय.
आजची मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, अशा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतू राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीपर्यंत धीर धरा असा सल्ला दिल्याचे कळतेय. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संवाद साधल्याची माहिती देण्यात येतेय. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हद्वारे संवाद साधला होता. यावेळीच ते राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र शरद पवारांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखलं होतं. आताच्या तिघांमध्ये झालेल्या फोनवरील संवादात नेमकं काय घडलं, हे कॅबिनेट बैठक संपल्यानंतरच आपल्याला कळू शकेल.