मुंबई (वृत्तसंस्था) २० हजारच्या वर रुग्ण बाधित येत असले तरी लक्षणं असलेली रुग्ण संख्या कमी आहे. २० हजार कोविड पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १७ हजार रुग्णांना लक्षणं नाहीत. लॉकडाऊन हा शब्द घाबरवण्यासाठी नाहीये. काळजी घेतली तर लॉकडाऊन लांब ठेऊ शकतो हे माझं म्हणणं आहे. लॉकडाऊन होणारच असं मी कधी बोलले नाही. असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
घाबरणं हा आमचा स्वभाव नाही. २५०० रुग्ण सध्या उपचार घेतायत, आज नवे ९५० रुग्ण दाखल झाले यातील २८० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. BKC मध्ये एकही ICU पेशंट नाही हा मोठा दिलासा आहे. २० हजार रुग्ण असले तरी १७ हजार रुग्णांना लक्षणं नाहीत. घाबरू नका, नियम पाळा. याला विरोधक नाटक म्हणत असतील तर त्यांचा काय ड्रामा आहे का ? फुल लॉकडाऊन, मिनी लॉकडाऊन अशी चर्चा सुरू आहे. मात्र निर्बंध येऊ शकतात असंही महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, खुर्चीत बसून टीका करणं सोपं असतं, प्रत्यक्ष काम करुन दाखवा असं आव्हान महापौर किशोरी पेडणेकर यांनी टाका करणाऱ्या भाजप नेत्यांना दिलं आहे. विरोधक घरात बसून आकडे लावतात, आम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहणी करतो. आकडे काय खोटे आहे का ? विरोधक अर्थाचे अनर्थ करतायत. विरोधकांनी लोकांना उकसवू नका, घाबरवू नका. कावीळ झाली की सगळं पिवळच दिसतं.